“BSNL मधून निवृत झालेल्यांच्या पेंशन मधे वाढ न झाल्याने देशभरातील पेन्शनर्सचा लढा उभारणार”- हरि सोवनी


भारतीय दूरसंचार पेंशनर्स संघाच्या पुणे विभागाचा स्नेहमेळावा नुकताच पुणे येथे संपन्न झाला
पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
दूरसंचार खाते, बीएसएनएल एम टी एन एल इत्यादि विभागातून सेवानिवृत्त झालेले सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी भारतीय दूरसंचार संघ ही भारतीय मजदूर संघाशी संलग्नीत संघटना भारतभर कार्य करते. BSNL मधुन निवृत्त, व्ही आर एस घेतलेल्या कामगार, कर्मचारी ना पेंशन मधील वाढ हा निर्णय प्रलंबित असून या करिता सरकाराने सकारात्मक निर्णय करून पेंशनर्स न्याय देण्यात यावा अन्यथा या करिता देशभरात लक्षवेधक आंदोलन छेडण्यात येईल असे मनोगत भारतीय दूरसंचार पेंशनर्स संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे सरचिटणीस हरि सोवनी यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे
. संघटनेच्या पुणे जिल्ह्याचा वार्षिक स्नेहमेळावा दिनांक १०.०८.२०२५ रोजी संकल्प मंगल कार्यालय, नवी पेठ पुणे-३० येथे संपन्न झाला मेळाव्यास २५५ हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.स्नेहमळाव्याचे उद्घाटनास सी जी एच एस च्या पुणे विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर सी पी चौधरी आणि भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री श्री. किरण मिलगीर , संघटनेचे महामंत्री श्री हरि सोवनी उपस्थित होते.
सी जी एच एस च्या पुणे विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर चौधरी यांनी सी जी एच एस च्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील व्यवस्थे बरोबर आगामी काळातील सी जी एच एस विस्ताराची माहिती देऊन सातारा, अहिल्यानगर , सांगली, कराड आणि कोल्हापूर येथे सी जी एच एस च्या विस्ताराचे प्रयत्न असल्याचे नमूद केले.
भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री श्री. किरण मिलगीर यांनी भारतीय मजदूर संघाच्या ७० वर्षे पूर्तीनिमित्ताने भारतीय मजदूर संघाच्या कार्याचा आढावा घेतला आणि भारतीय मजदूर संघाने जी-२० च्या शिखर परिषदेत एल-२० च्या अध्यक्षपदा मार्फत देशातील कामगारांचे नेतृत्व करून कामगार जगतात आपला ठसा उमठवल्याचे सर्वांच्या निदर्शनास आणले.
स्नेहमेळाव्याच्या अन्य सत्रांमध्ये संघटनेच्या पुणे विभागाचे कार्यवृत्त श्री. जयवंत पुरंदरे यांनी सर्वांसमोर ठेवले. या मेळाव्यास संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडळाचे सचिव श्री. उदय गाडेकर यांनी संघटनेच्या सेवानिवृत्तांसाठीच्या कार्याची माहिती देऊन संघटनेने सेवानिवृत्तांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी सामूहिक धोरणांसाठी केलेले कार्य आणि व्यक्तीगत प्रश्नांची यशस्वी सोडवणूक केल्याचे स्पष्ट केले. आणि त्याचा फायदा संघटना वाढीस झाल्याचे सांगितले.
स्नेहमेळाव्याच्या समारोपाच्या सत्रात संघटनेचे अखिल भारतीय महामंत्री श्री. हरि सोवनी यांनी संबोधित केले. tयांनी बीएसएनएल मध्ये सन २०१७ पासून प्रलंबित असलेली पेंशन वाढ आणि बीएसएनएल मधील कार्यरत कर्मचाऱ्यांची पगारवाढीवर प्रकाश टाकला आणि गेल्या ८ वर्षे हून अधिक काळ सरकार आणि संघटना यांच्यात या विषयी कोर्ट केसेस मुळे कसा लपंडाव चालू आहे हे स्पष्ट केले.
बीएसएनएल मॅनेजमेंट या बाबत उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले. आता या विषयात भारतीय मजदूर संघाने लक्ष्य घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे हे ही श्री. हरि सोवनी यांनी सांगितले. त्यामुळे आता निक्षित पेंशन रिवीजन होईल असा विश्वास स्नेहमेळाव्यात उपस्थित प्रतिनिधिंनी व्यक्त केला
. स्नेहमेळाव्यास संघटनेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष श्री. नागेश शिंदे आणि भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण हे ही उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यास पुणे परिसरात राहणाऱ्या नागपूर, संभाजीनगर, धुळे, यवतमाळ , सांगली, नांदेड, लातूर , सातारा , सांगली येथील सदस्यही उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र कातरकी आणि सौ स्मिता हरहरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. प्रशांत घाटे यांनी केले.