मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का

ps logo rgb

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत !

! बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि “पत” आणि “पेढी”साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत !! बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “निर्भय”वक्त्यांपर्यंत…सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची!!, असे आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे.

भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही या विजयावर भाष्य केले आहे. या निकालातून हे स्पष्ट झाले आहे की, मुंबईकरांचा आशीर्वाद ‘ड्युप्लिकेट ब्रँडला’ नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टॅण्डला आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उबाठाचा पूर्ण पराभव झाला. यावर संजय राऊत आधी “मुंबईत आमचाच ब्रॅंड चालणार”, अशी पोपटपंची करत होते. पण आता निकाल लागल्यानंतर त्यांची दातखिळी बसली आहे. नेहमीप्रमाणे “EVM, व्होट चोरी” असे खोटे आरोप करण्याचा मुद्दाही त्यांच्याकडे उरलेला नाही

. बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी थेट मतदानातून उबाठाचा धुव्वा उडवला आहे. यापुढे मुंबईत केवळ हिंदुत्वाचा ब्रँड विजयी होईल, ड्युप्लिकेट ब्रँड नाही हे या निकालातून अधोरेखित झाले आहे, असे नवनाथ बन म्हणाले.मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली, तर भाजपच्या ‘सहकार समृद्धी पॅनेल’ने ७ जागांवर विजय मिळवला.

या विजयानंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.या निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. “बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड २१ विरुद्ध शून्य असा पराभूत झाला आहे, याचाच अर्थ ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत.” असे प्रसाद लाड यांनी म्हटले.

भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले आहे. हा विजय भाजपसाठी मुंबईकरांचा शुभसंकेत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि ‘पत’ व ‘पेढी’साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा दिला,” असे शेलार म्हणाले.

j