नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

1004810608

**नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन*

*पिंपरी प्रतिनिधी : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक भान जपत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध आरोग्य व जनहिताच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे

.याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,समाजाने मला दिलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या हितासाठी उपयुक्त उपक्रम राबवावेत, हा माझा नेहमीच आग्रह असतो. आरोग्य शिबिर, रक्तदान व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे

. अधिकाधिक गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा२७ ऑगस्ट रोजी **गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्र** उभारण्यात येणार असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.

यानंतर २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत **रक्तदान शिबिर** आयोजित करण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तसेच २९ व ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत **मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन** करण्यात आले आहे

. या शिबिरामध्ये खालील नामांकित रुग्णालयांचा सहभाग असणार आहे* लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड* तळेगाव ओंको लाईफ हॉस्पिटल* साने गुरुजी हॉस्पिटल, हडपसर* कै. शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालय* अजमेरा साई दीप ENT रुग्णालय, पिंपळे सौदागर* स्पर्श हॉस्पिटल, सोमाटणे* रुबी अलकेअर* वाय.सी.एम. रुग्णालय पतपेढी व इतर रुग्णालयेगरीब व गरजू नागरिकांना मोफत उपचारांची सुविधा देत आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना कोणतेही शुल्क न देता वैद्यकीय तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळाल्यामुळे गंभीर आजार टाळता येणार आहेत

,नागरिकांमध्ये शिबिराद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छता, पोषण, नियमित तपासणी याबाबत जागरूकता वाढविणे शक्य होणार आहे तसेच शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार असून कॅन्सर,केमोथेरपी,रेडीएशन, हृदय, डोळे, हाडे, स्त्रीरोग, इत्यादींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. ज्याचा खर्च सामान्य नागरिक करू शकत नाहीत तसेच अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी वाढते आणि नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. अधिकाधिक गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे