भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी 126 पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी

bjp-zendaa

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी 126 पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी

केली घोषित* *पिंपरी-चिंचवड:* बहुप्रतीक्षित भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाचे शुभमुहूर्त साधून पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष , ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी 126 पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्व घटकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे

.ही कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी शहराध्यक्ष काटे यांनी पक्षाच्या कार्यालयात 300 हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, शहरातील प्रमुख स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.

या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. ज्या कार्यकर्त्यांना या वेळी पदावर संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी भविष्यात निश्चितपणे योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासनही शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले.

*नव्या कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी:**सरचिटणीसपदी* ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*

वरिष्ठ उपाध्यक्ष:* काळूराम बारणे, *उपाध्यक्षपदी* : ॲड. विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू यांची निवड झाली आहे. *सचिवपदी* : नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कथोरे, दीपक भोंडवे, ॲड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजीत बोरसे तर कोषाध्यक्ष: हेमचंद्र मासुळकर, कार्यालय प्रमुख: संजय परळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

. *विविध मोर्चे आणि आघाड्यांचे प्रमुख:*युवा मोर्चा अध्यक्ष : दिनेश यादवमहिला मोर्चा अध्यक्ष : सुजाता पालांडेअनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : अनिल उर्फ बापू घोलपओबीसी मोर्चा अध्यक्ष : चेतन भुजबळव्यापारी आघाडी अध्यक्ष : राजेंद्र चिंचवडे कायदा आघाडी अध्यक्ष : ॲड. गोरख कुंभार सोशल मीडिया सेल: सागर बिरारी

ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष : सुनील लांडगे सांस्कृतिक सेल अध्यक्ष : विजय भिसे,ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष : विजय शिनकर

माजी सैनिक सेल अध्यक्ष : देविदास साबळेआध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष : जयंत बागलआयुष्मान भारत सेल अध्यक्ष : गोपाळ माळेकरबेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष : प्रीती कामतीकर अभियंता सेल अध्यक्ष : संतोष भालेरावचार्टर्ड अकाउंट सेल अध्यक्ष : बबन डांगले दिव्यांग सेल अध्यक्ष : अंकुश शिर्के वैद्यकीय प्रकोष्ठ अध्यक्ष: डॉ. अमित नेमानेगृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ : प्रदीप बेंद्रेवकृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ : हरीश मोरे मन की बात संयोजक : नंदकुमार दाभाडे यासह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Latest News