हजारो नागरिकांचा सहभाग;संदीप वाघेरे आयोजित मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी !


पिंपरी प्रतिनिधी – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक २९ व ३० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड परिसरात पार पडले.
शिबिरात हृदयविकार, डोळ्यांचे आजार, कर्करोग, हर्निया, अपेन्डीस, न्युरोलोजी, युरोलोजी, अस्थिरोग, महिलांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, सामान्य शस्त्रक्रिया अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या शिबिराचा १७५४ नागरिकांनी लाभ घेतला.या उपक्रमात स्थानिक कार्यकर्त्यांनी रुग्णांची नोंदणी, तपासणी व मार्गदर्शनाचे उत्तम नियोजन केले. आरोग्य शिबिराद्वारे समाजाच्या आरोग्य जाणीवेत वाढ होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली.
या शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, तळेगाव ऑनको लाईफ हॉस्पिटल, रुबी अलकेअर पिंपरी, जीवनज्योती हॉस्पिटल पिंपळे सौदागर, स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे, साई-दीप हॉस्पिटल पिंपळे सौदागर, एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय हडपसर, साने गुरुजी आरोग्य केंद्र हडपसर, कै.शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालय अजमेरा,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (अस्थिरोग विभाग), ज्योती होमिओपॅथिक क्लिनिक पिंपरी,अल्कोहोलिक अॅनॉनिमस व्यसनमुक्ती केंद्र, जिजामाता रुग्णालय यांनी सहभाग घेतला.
संदीप भाऊ वाघेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करणे हेच खरी समाधानाची बाब आहे” असे सांगितले.या शिबिरास आज आपण सर्व एकत्र आलो आहोत या आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरात भाग घेतल्यामुळे आपले आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल पुढे टाकली आहे. आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य आणि जीवनशैली मिळवून देण्यासाठी, हे शिबिर खूप उपयुक्त ठरते. आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या युगात जेव्हा जीवनशैलीतील बदल, ताणतणाव आणि पर्यावरणीय घटक आपल्या आरोग्यावर परिणाम करीत आहेत, त्यामुळे या शिबिराचे महत्त्व आणखी वाढले. आपल्या समाजातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळवून देण्यासाठी माझ्यावतीने निरंतर प्रयत्न सुरु राहतील. आशा भावना वाघेरे यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, शेखर अहिरराव, शुभम मिटकरी, किरण शिंदे, विठ्ठल जाधव, गणेश मंजाळ, हनमंत वाघेरे,शुभम शिंदे,राकेश मोरे, राजकुमार गुंदिले, समीक्षा चिकणे, प्रीती साळे यांनी केले.