पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाच्या बोलणीला बोलावून बेदम मारहाण, दुर्दैवी मृत्यू


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नात्यातील एका मुलीच्या 26 वर्षीय प्रियकराला 11 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे तर आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे
. या घटनेने एक भीतीचे वातावरण हे बघायला मिळत आहे.मुलीच्या घरच्यांचा लग्नासाठी नकार दोघेही लग्नावर ठाम असल्याने, तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोवादबत त्यांच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली.ही घटना 22 जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मयत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.
लग्नाच्या बोलणीला बोलावून बेदम मारहाण रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही. ही माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत लगेचच रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केले आरोपीला अटक रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर, करण खोकरसह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार 2 आरोपींचा शोध सुरू आहे. जितेंद्र कोळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी हे यांनी याबद्दलची माहिती दिली. पोलिस इतर आरोपींचा सध्या शोध घेत आहेत. मुलाचा जीव मारहाणीत गेल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे