उज्ज्वल मित्र मंडळ पिंपरीगावतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ps logo rgb

पिंपरी प्रतिनिधी – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
उज्ज्वल मित्र मंडळ, पिंपरीगाव या प्रतिष्ठित मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उपयुक्त उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण, तसेच बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. समाजातील संवेदनशीलतेचा भाग म्हणून मोकाट गोवंशांसाठी चारा वाटप हाही उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याशिवाय महिलांच्या सहभागासाठी मनोरंजनासह सांस्कृतिक व बौद्धिक दर्जा वाढविणारा विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या या विविध उपक्रमांमुळे समाजातील सर्वच घटकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य उज्ज्वल मित्र मंडळ करीत आहे.