हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही- मंत्री अतुल सावे


पुणे(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
ओबीसी समजाच्या आरक्षणावर कुठलीही गदा येणार नाही याची त्यामध्ये काळजी घेतलेली आहे असे सावे म्हणाले.हैदराबाद गॅझेटप्रमाणेच जी नावं असतील त्याप्रमाणेच त्यांना मिळणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाहीये असं सांगत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चार सावे यांनी केला. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही,
बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. आज सकाळी अतुल सावे, परिणय फुके यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली,
त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही याचा उच्चार सावे यांनी केला
. मराठा आरक्षणविषयक जीआरविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले होते. वेळ आली तर न्यायलायतही जाऊ असेही भुजबळ म्हणाले होते. ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसून आला, मात्र आता सावेंच्या श्वासनानंतर ते पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गेल्या 6 दिवसांपासून नागपूरमध्ये उपोषण सुरू होतं. आणि दोन दिवसांपूर्वीच मुंबईतलं जरांगेंचं उपोषण सुटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आज इथे बबनराव तायवाडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली.
14 मागण्यांसाठी त्यांचं उपोषण सुरू होतं. ज्या मागण्या केल्यात, त्यावर बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढू. आधी सांगितलं होतं तसं ओबीसीची आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, आपण सगळ्यांनी जीआरचा अभ्यास केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानात तळ ठोकून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर जरांगेनी उपोषण सोडलं. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला,
मात्र त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या दिसून आल्या. अनेक ठिकाणी शासन निर्णयाची होळी करण्यात आली तसेच मोर्च काढण्यात आले. आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाचे नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू असून आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी दाखल होत आंदोलकांची भेट घेतली. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही, असं ते म्हणाले. यावेळी सावे यांच्यासह परिणय फुके हेदेखील आंदोलनस्थळी होते.