पुणे संचेती जवळील ”एमआरव्हीसी” ने पूल पाडण्याचा घेतला निर्णय…?

ps logo rgb

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

संचेती पुलाच्या खालून सध्या दोन मार्गिका आहेत. मार्गिका वाढविण्यासाठी पुलामुळे जागा कमी पडते. परिणामी ‘एमआरव्हीसीने पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात लवकरच पुणे महापालिकेशी पत्र व्यवहार केला जाणार आहे. नव्या मार्गिकेवर काही ठिकाणी आणखी पूल येणार असल्याचे एमआरव्हीसी च्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

  राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ५,१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून जीआर आल्यानंतर, मुंबई रेल्वे विकास महामंडळ हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करेल.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे.राज्य सरकारने पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिल्यानंतर आता एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) कडून हालचालींना वेग आला आहे.

एमयुटीपी अंतर्गत हा प्रकल्प होणार आहे. याचे काम ‘एमआरव्हीसी’ करणार आहे. पहिल्या टप्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान अतिरिक्त मार्गिकेचे काम केले जाईल. तर दुसऱ्या, चिंचवड ते pune  या टप्प्यात संचेती हॉस्पिटलजवळील  संचेतीकडून संगमवाडीला जाणारा पूल पाडावा लागणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पहिल्या टप्प्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान काम-प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चिंचवड ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिका टाकल्या जातील. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन मार्गिकांमुळे ही समस्या दूर होईल आणि लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेगवान प्रवासाचा अनुभव मिळेल.

दुसऱ्या टप्प्यात संचेती पूल पाडून नवा पूल उभारणार-प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात संचेतीजवळील जुना पूल पाडण्यात येईल. हा पूल संचेतीहून संगमवाडीकडे जाणाऱ्या रोड ओव्हर ब्रिजचा एक भाग आहे. हा पूल पाडून त्याजागी नवीन आणि अधिक आधुनिक पूल बांधला जाईल. या बदलांमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल,-

Latest News