सीबीएसईकडून (CBSE) दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) सीबीएसईच्या संभाव्य डेटशीट नुसार, दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारीला सुरु होईल तो 6 मार्च 2026 ला संपेल. दहावीची दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे रोजी सुरु होईल ती 1 जूनला संपेल. बारावीची बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारीला सुरु होईल ती 9 एप्रिल 2026 ला संपेल. सीबीएसईच्या परिपत्रकानुसार भारतात जवळपास 45 लाख विद्यार्थी या परीक्षांना बसतील. देशातील 2024 विषयांसह विदेशातील 26 देशात परीक्षा आयोजित केली जाणार आहे. बोर्डानं हे देखील सांगितलं आहे. हे वेळापत्रक संभाव्य आहे.शाळांकडून विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रस्तुत केल्यानंतर अंतिम वेळापत्रक जारी केलं जाणार आहे. सीबीएसईनं हे स्पष्ट केलं की परीक्षानंतर मूल्यांकन प्रक्रिया वेळेवर सुरु केली जाणार आहे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेनंतर दहा दिवसांनी उत्तर पत्रिका तपासणी सुरु होईल आणि ती 12 दिवसात संपणार आहे.उदा. 12 वीच्या भौतिकशास्त्राचा पेपर 20 फेब्रुवारीला झाला तर उत्तर पत्रिका तपासणी 3 मार्चला सुरु होईल आणि 15 मार्चला संपेल.बोर्डानं संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी जारी केलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं 2026 साठी दहावी आणि बारावीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईनं दहावी आणि बारावीचं संभाव्य वेळापत्रक जारी केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटीसनुसार पहिल्या टप्प्यातील 17 फेब्रुवारी 2026 ला परीक्षा सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 15 जुलै 2026 ला संपेल. या वेळी मुख्य परीक्षेसह विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे.दहावीची दुसरी परीक्षा आणि बारावीची पुरवणी परीक्षा देखील आयोजित केली जाणार आहे.