गुलटेकडीतील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुण्यातील गुलटेकडी परिसरातील मुकुंदनगर आणि मार्केटयार्ड भागात हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत, मार्केटयार्ड भागातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे चार महिला काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या चारही महिलांची सुटका केली.
यात छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईमध्ये, मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक सेंटर या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक तोतया ग्राहक पाठवला. त्यानंतर, पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी सेंटरची मालक आणि व्यवस्थापक कविता आनंद शिंदे हिच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच तिला अटक करण्यात आली.पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने स्वारगेट परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून साधारण 5 पीडित महिलांची सुटका केली. तर या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस आयुक्त आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटर, स्पा किंवा आयुर्वेदिक केंद्रांच्या नावाखाली असे बेकायदेशीर धंदे चालवले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना येत आहेत. आरोग्यसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना या घटनांची त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. जेणेकरून अशा गैरकृत्यांवर वेळीच आळा घालता येईल. ही कारवाई एकट्या पुण्याची नसून, शहराच्या विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या केंद्रांवर पोलिसांची करडी नजर आहे. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.