खराडी येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरण : गुन्ह्यात आरोपीचा जामीन मंजूर

court-gavel

पुणे ) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
खराडी येथील रेडिसन हॉटेलजवळच्या आलिशान फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावावर रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपावरून अटक केल्यापैकी एक प्राची गोपाळ शर्मा यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा कारवाई केली होती. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील या प्रकरणात आता जामीन मंजूर झालेला आहे.खराडी पोलीस स्टेशन, पुणे येथील गुन्हा क्र. १५४/२०२५ या गुन्हयामध्ये २.७ ग्रॅम्स कोकेन व ७० ग्रॅम्स गांजा बाळगल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर आरोपींपैकी आरोपी प्राची गोपाळ शर्मा यांचा पुणे येथील मा. विशेष अतिरिक्त न्यायाधीश श्री. जे. जी. डोरले यांनी दिनांक २५/०९/२०२५ रोजी जामीना मंजूर केला आहे. सदर आरोपीतर्फे अ‍ॅड. राजू लक्ष्मणराव मते व अ‍ॅड. श्रीनाथ राजू मते यांनी काम पाहिले.

Latest News