मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात जमला पूरग्रस्तांसाठी सात लाखाचा निधी


मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी सात लाख रुपयांचा निधी जमा झाला. मराठवाड्यातील आपल्या बांधवांचा संसार पुन्हा उभा राहावा, यासाठी देणगी देण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केले होते. दरम्यान, विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मराठवाडाभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
मराठवाडा जनविकास संघ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्तपणे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव व पूरग्रस्त सद्भावना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भावनिक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज काळेवाडी येथे ध्वजारोहणाने झाली. यानंतर कार्यक्रमापूर्वी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. भाऊसाहेब जाधव, दिनेश वाघमारे, डॉ. एस. एन. पठाण, महावितरणचे कार्यकारी अभियंते सोमनाथ मुंडे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. यावेळी मराठवाडा समन्वय समितीचे राजकुमार दुर्गुडे पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, प्रकाश इंगोले, मनोज मोरे, दत्तात्रय धोंडगे, धनाजी येळकर, सतीश काळे, शंकर तांबे, बाळासाहेब साळुंके, विठ्ठल नवाने, युवराज माने, सुर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, बाळासाहेब काकडे, श्रीमंत जगताप, राजेश घोडके, गणेश पाडुळे, जीवन बोराडे, केशव बोधले, गोरख पाटील, शिवाजी पाडुळे, नेताजी काशिद, सूर्यकांत चव्हाण, डी. एस. राठोड, प्रा. शाहूराज कदेरे, सचिन स्वामी, अनिताताई पांचाळ, कॅप्टन बालाजी पांचाळ, हरिभाऊ घायाळ, आण्णा जोगदंड, सुग्रिव पाटील, राजेंद्र मोरे, संजय जाधव, दिनेश पांढरे, अभिमन्यु गाडेकर, किशोर पाटील, सोमेश्वर झुमके, बळीराम कातंगळे, मुंजाजी भोजने, विजय वडमारे, शिवाजी घोडगे, बळीराम मळी, गोरख पाटील, दिनेश पवार, अतुल होळकर, जे.डी. माने, किशोर आटरगेकर, राहुल शिंपले, अर्जुन खामकर, सुग्रीव पाटील, गोविंद तांबवडे, रंगनाथ आवारे, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, की मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुक्तीसंग्रामातून मिळालेली प्रेरणा केवळ इतिहासापुरती मर्यादित न ठेवता, ती सामाजिक आणि आर्थिक विषमतेतून मुक्ती मिळवण्यासाठी वापरावी.
डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, की मराठवाड्याच्या जनतेत प्रचंड क्षमता आहे. एकत्र येऊन काम केल्यास आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. पूरग्रस्तांसाठी दाखवलेली ही सद्भावनाच आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. पुरुषोत्तम वायाळ म्हणाले, मराठवाड्याच्या शेतकर्यांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड द्यावी. पाणी व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मराठवाड्याला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्याची गरज आहे. अनिल कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी व्यक्त करत पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, पण समाजाप्रती आपली जबाबदारी वाढली आहे. पूरग्रस्तांसाठी उभा राहिलेला हा निधीच मराठवाड्याच्या एकजुटीचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. अमर सूर्यवंशी म्हणाले, गावाचा विकास साधताना लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो, हे मराठवाड्याने दाखवून दिले आहे. मुक्तीसंग्रामातून मिळालेल्या एकजुटीचा वापर आपण गावपातळीवरील समस्या सोडवण्यासाठी करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश इंगोले यांनी केले. आभार शाहूराज कदेरे यांनी मानले.
पूरग्रस्तांना मदतीचा हात :
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष निधी संकलन करण्यात आला. या सद्भावना सोहळ्यात उपस्थित दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला, जो पूरग्रस्तांना तत्काळ वितरीत केला जाणार आहे.
मराठवाडाभूषण पुरस्कारांनी मान्यवरांचा सन्मान :
आळंदीचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांना सांप्रदायिक पुरस्कार, जलतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांना कृषि पुरस्कार, जकेकूरवाडी (ता. उमरगा) अमर सूर्यवंशी यांना आदर्श सरपंच पुरस्कार, पीएमआरडीएचे सहय्यक नगररचनाकार धैर्यशील बुवा…