पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती न देण्यासाठी प्रशांसनावर उपायुक्त सचिन पवार यांचा दबाव?

pcmc-2

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी  पदावर पदोन्नती देऊ नये या साठी उपयुक्त टाकतात प्रशासनावर दबाव

पिंपरी : (विनय लोंढे )

आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी पात्र अधिकारी नाही असे कारण सांगून त्या पदावर आजतागायत कोणाचीही वर्णी लागलेली नाही. मात्र प्रशासनाने अनेकदा अनेक अधिकाऱ्याच्या चौकशी चालू असून देखील  त्यांना पदोन्नती दिली आहे.मात्र आरोग्य अधिकारी नियुक्त होऊ नये असा दबाव  शासनाचे अधिकारी खुद्द उपायुक्त सचिन पवार यांनी आयुक्तानावर दबाव आणला असल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कुठलीही परिपूर्ण माहिती अनुभव नसतानाही हे उठसुठ सल्लागार नेमून त्याच्या अतोनात खर्च करून जनतेचा कररुपी जमा झालेला पैशाची उधळपट्टी करीत आहेत या पूर्वी या पदावर चव्हाण, डॉ अनिल रॉय, डॉ गोफने यांनी कामकाज पहिले आहे त्यावेळी कोणताही सल्लागार नेमला नव्हता आता सल्लागार नेमण्याची गरज काय जर यांना सल्लागाराशिवाय जमत नसेल तर त्यांनाच त्या पदावरून काढावे. अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

सल्लागारा च्या इशारावर आरोग्य विभागाचे कामकाज चालवतात त्यामुळं या विभागाचे कामकाज ढासळले आहे प्रत्येक आठवड्याला दोन दोन मिटींगा घेऊन त्यांनी काय साध्य केले आहे त्यांनी ते सांगावे कोणताही ठोस निर्णय घेत नाही त्यामुळं या विभागाला पालिकेच्या अधिकाऱ्याची नितांत् गरज आहे उपयुक्त सचिन पवार यांची हुकूमशाही पद्धतीने कामकाज चालू आहे अशी चर्चा पालिकेत अधिकारी करताना दिसतात. आरोग्य विभागाचे अनुभव नसनाऱ्या अधिकाऱ्या च्या हाती शहराच्या तीस लाख लोकांच्या आरोग्याशी खेळायचा अधिकार यांना कोणी दिला?

पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने महापालिकेने आरोग्य विभागात २२ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून ३७७४ व महापालिका आस्थापनेवरील १७८८ अशी एकूण  ५५६२ कर्मचाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचऱ्यांच्या कामाचे नियोजन करणे, त्यांच्या प्रशासकीय अडी अडचणी सोडविणे, त्यांची पगार बिले वेळेत तयार करणे, नागरिकांच्या आरोग्य विषयी तक्रारीचे निवारण करणे ही महत्वाची कामे महापालिका आरोग्य अधिकारी करत असतो.

३१ जुलै २०२५ रोजी  तत्कालीन आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे हे सेवानिवृत्त झाले.पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी पदी पदोन्नती द्यायला प्रशासनाला वेळ नाही.  आरोग्य विभागाची  स्वच्छता  कामाची करोडोची  बिल हे महिन्याला निघतात त्यातून मिळणारे  टक्केवारी  मध्ये कोनलाही हिस्सा मिळू नये या साठी आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांचा  आयुक्तानावर व प्रशासनावर  दबाव असल्याचे चर्चा पालिकेत दबक्या  आवाजात सुरु आहे

महापालिका आरोग्य विभाग  कामकाजाचा व्याप पाहता गणेश देशपांडे यांच्या खुर्चीवर दुसऱ्या अधिकाऱ्याची वर्णी ताबडतोब लावणे आवश्यक होते मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर ही आरोग्य अधिकारी यांची खुर्ची रिकामी असून नागरिक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन पवार हे शासन नियुक्त अधिकारी असून ते काही महिन्यापूर्वी महापालिकेत रुजू झाले. त्यांना पिंपरी चिंचवड शहराची फारशी ओळख नाही. तरीही शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांनी  राजकीय दबाव  प्रशासनावर टाकत घेतली .

आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे नोकरीवर असताना आरोग्य विभागाचा सर्व कारभार सुरळीत सुरु होता मात्र देशपांडे यांची निवृत्ती नंतर या विभागातील तक्रारीचे प्रमाण वाढले. या खुर्चीवर कोणाची तरी नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच या पदावर इच्छुक असललेलले आरोग्य अधिकारी यांनी  मांडली  

आरोग्य अधिकारी देशपांडे हे निवृत्त झाल्यानंतर तानाजी दाते या सेवाजेष्ठ अधिकाऱ्याला हे पद देणे क्रम पात्र असताना हे पद अध्यापही रिक्त का ठेवले इखाद्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचा फौजदारी गुन्हा न्याय प्रविष्ठ असताना त्यांना पदोन्नती देऊ नये असा कोणताही शासन निर्णय नाही असे असतानाही जाणीवपूर्वक मागासवर्गीय अधिकारीऱ्यांवर महापालिका आयुक्त अन्याय करीत आहेत

पदभार देणे क्रमप्राप्त होते मात्र दाते यांची कोर्टात केस चालू आहे असे कारण देत त्यांना बाजूला केले. त्यांच्या नंतरच्या अधिकाऱ्यास किमान प्रभारी चार्ज देणे गरजेचे होते. महापालिकेत मुख्य शहर अभियंता पदापासून अनेकांना प्रभारी चार्ज दिला आहे. मात्र आरोग्य अधिकारी मात्र पद रिकामे ठेवले आहे.

आरोग्य विभागात ३,७७४ कर्मचारी ठेकेदार पद्धतीने घेतले आहेत. त्यांची पगार बिले व इतर कामाची बिले मिळून दर महिन्याला जवळपास १२ कोटीचे काढले जातात. या बिलापोटी मोठे कमिशन दिले जात असून आरोग्य अधिकारी आणि स्वतःचे असे दोन्ही मिळून कमिशन स्वतः लाच मिळावे या उद्देशाने उपायुक्त सचिन पवार हे महापालिका प्रशासनावर दबाव आणून आरोग्य अधिकारी हे पद रिक्त ठेवत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक कर्मचारी व अधिकारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठा  आकडा आहे. त्यामुळे महापालिका ठेकेदार नेमून त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करुन घेतले जाते. त्यासाठी  22 एजन्सी नेमल्या आहेत. मात्र ठेकेदाराने बिलासाठी दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष कामावर असलेले कामगार यांच्यामध्ये खूप मोठीं तफावत असते,

त्याबदल्यात मोठया  रकमेचे कमिशन दिले जात असल्याचे कर्मचारी खाजगीत सांगत आहेत.

सुमारे तीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड  शहराचे आरोग्य सांभाळणारे महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांची खुर्ची गेली दोन महिन्यापासून रिकामी असून महापालिकेने शहरातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

Latest News