-TCS- कर्मचाऱ्यांना नोकरीवरून,अचानक कमी केले कर्मचारी संघटनांन मध्ये चिंता

tcs

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचारी कपातीचा वाद सध्या पुण्यातून जोर धरत आहे. अलीकडेच पुण्यातील TCS ऑफिसमधून २५०० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून कमी करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर कर्मचारी संघटनांनी चिंता व्यक्त करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून आपली अडचण मांडली आहे.

जुलै २०२४ मध्ये TCS ने देशभरातील १२,२६० कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती, जी कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे २ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीकडे ६,१३,०६९ कर्मचारी होते. त्यामुळे संघटनेच्या दाव्यानुसार जरी मोठ्या प्रमाणात कपात झाली असली तरी कंपनीने ती फारसीमर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे.

TCS ने मात्र या सर्व आरोपांना जोरदार नकार दिला आहे. कंपनीच्या अधिकृत वक्तव्यानुसार, जे दावा केले जात आहेत ते चुकीचे आणि भ्रामक आहेत.

TCS ने सांगितले की, अलीकडील कर्मचाऱ्यांवर परिणाम अत्यंत मर्यादित संख्येत झाला असून, ज्यांच्यावर परिणाम झाला त्यांची सर्व देखभाल केली गेली आहे. तसेच, प्रभावित कर्मचाऱ्यांना योग्य सेवरन्स पॅकेज देखील दिले गेले आहे,

जे त्यांच्या अधिकारांनुसार आहे. कंपनीने स्पष्ट केले की, ही कर्मचाऱ्यांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी आहे आणि त्यामुळे ही बाब गंभीर सामाजिक संकट निर्माण करणारी नाही.

कर्मचारी संघटना नैसेंट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉई सीनेट (NITES) ने दावा केला आहे की कंपनीने कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून राजीनामा घ्यायला भाग पाडले. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंह सलूजा यांच्या मते, TCS ने इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स एक्ट, १९४७ चं उल्लंघन केल्याचं दिसत आहे,

कारण सरकारला नोटीस न देता आणि योग्य प्रक्रिया न पाळता कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं.सध्या या वादाचे सर्व लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे.

राज्य सरकार या घटनेवर लक्ष ठेवून योग्य ती भूमिका घेईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. TCS आणि कर्मचारी संघटनेच्या या संघर्षाचे अंतिम स्वरूप काय असेल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.NITES ने याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या मते, कर्मचाऱ्यांवर ज्या प्रकारे दबाव टाकला गेला आणि त्यांना राजीनामा घ्यायला भाग पाडलं गेलं, ते गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम निर्माण करू शकतं. या घटनेमुळे TCS च्या HR धोरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.