‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ 10 ते 14 डिसेंबर ला

ps logo rgb

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव डिसेंबरमध्ये रंगणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १० ते १४ डिसेंबर यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

पाच दिवस महोत्सव रंगणार आहे. मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात महोत्सव होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. महोत्सवाच्या तारखांची घोषणा जोशी यांनी शुक्रवारी (दि.३) केली.

महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे देशविदेशातील रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.महोत्सवाच्या तारखा जाहीर होताच रसिकांच्याही त्याबाबतचे नियोजन करायला सुरुवात करतात. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या.

यंदा ७१ व्या वर्षात पदार्पण करणारा हा महोत्सव पाच दिवस रंगणार असून, संस्थेतर्फे कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक लवकरच जाहीर येईल.सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजे रसिकांसाठी सुरेल पर्वणी. दरवर्षी रसिक या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पुण्यातील सांस्कृतिक वैभवाचा हा महोत्सव एक भाग असून, या महोत्सवात देशविदेशातील रसिकांची उपस्थिती असते. दिग्गज आणि नवोदित कलाकारांच्या कला सादरीकारणाने महोत्सव रंगतो.पुण्यातील सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग असलेला