गौतमी पाटील यांना पोलिसांनी बजावली नोटीस…


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) वडगाव बुद्रुक येथे एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता
.वडगाव बुद्रुक येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिसांनी कारवाई वेगाने केली असून, चारचाकी वाहनाच्या मालकिण प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारचालकाला अटक केली. अपघातात सामील कार ही गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचे समोर आले असून, याच कारणामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.दरम्यान, जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्याने तपासावर परिणाम होत आहे आणि प्रत्यक्ष कारचालक बदलल्याचीही शंका त्यांनी व्यक्त केली आहे.