पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ / गायवळ याने नावात फेरफार करून पोलिसांची दिशाभूल…


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना
पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेशने खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवला असल्याने तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे.
दुहेरी मतदार नोंदणी
नीलेश घायवळ-पत्नीने आपली नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यातील कोथरूड आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात नोंदविल्याचेही उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा प्रकार समोर आणला. दोन्ही मतदार ओळखपत्रांवर त्याचे आडनाव ‘गायवळ’ असेच नमूद आहे.
खोटी प्रतिज्ञापत्रे आणि चौकशी
पासपोर्ट काढताना नीलेशने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात “राज्यात कुठेही माझ्यावर गुन्हा नाही” अशी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर आणखी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पोलिस पडताळणीदरम्यान तो पत्त्यावर आढळून न आल्याने पासपोर्ट विभागाने त्याला दिलेली नोटीसही त्याने उत्तर न देता टाळली होती.
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने नावात फेरफार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही कागदपत्रांवर त्याचे आडनाव ‘गायवळ’ असल्याचे दिसत असून, त्याने गुन्ह्यांपासून सुटका करून घेण्यासाठी ही चलाखी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नावातील ‘गोंधळ’ उघड
आधारकार्डसह पोलिसांना मिळालेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांत नीलेशचे नाव ‘नीलेश गायवळ’ असे नमूद आहे. मात्र, पुण्यात गुन्हा दाखल करताना त्याने स्वतःचे नाव ‘घायवळ’ असे सांगून पोलिसांना फसवले. हा गोंधळ जाणूनबुजून घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.
परदेशातील हालचाली
११ सप्टेंबरपासून नीलेश परदेशात असल्याचे समोर आले आहे. ‘मकोका’ प्रकरणात न्यायालयाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले असतानाही त्याने तो वापरून परदेश गाठला. तपासात उघड झाले की, पासपोर्ट काढताना त्याने ‘गायवळ’ या नावाने प्रक्रिया पूर्ण केली होती.