निवडणुकीत उत्तर भारतीय समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी…नवीन सिंग

ps logo rgb


पुणे, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) आगामी महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीय समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली आहे. विमाननगर, लोहगाव आणि वाघोली परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये ९२ हजार मतदार आहेत.उत्तर भारतीयांची संख्या सुमारे साठ टक्के आहे. यापैकी अनेक जण संरक्षण दलातून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उत्तर भारतीय उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नवीन सिंग हे उत्तर भारतीय समाजातील विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

नवीन सिंग यांनी सांगितले की उत्तर भारतीय समाजाने नेहमीच पुणे शहराच्या विकासात आणि सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे. शहरातील बांधकाम, वाहतूक, सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांना राजकीय संधी मिळाल्यास समाजाचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडता येईल.