दादर येथे ‘दस्तकारी हाट : हातमाग,विणकरांचे वस्त्र प्रदर्शन


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
देशभरातील १२ राज्यातील हातमाग,विणकरांचे ‘दस्तकारी हाट’ हे वस्त्र प्रदर्शन स्काऊट हॉल, शिवाजी पार्क (दादर)येथे ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनात भारतातील अस्सल हातमाग, पारंपरिक कापड आणि कलात्मक फॅब्रिक्सचे आकर्षक दर्शन घडणार आहे.
‘दस्तकारी हाट’ मध्ये देशभरातील विविध राज्यांतून आणलेले रेशीम, कापूस आणि पारंपरिक विणकामाचे सुंदर नमुने पाहायला मिळतील. सुमारे ५० हून अधिक स्टॉल्समध्ये पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा समृद्ध फॅब्रिक संग्रह सादर करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी हे प्रदर्शन एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. हाताने विणलेल्या साड्या, ड्रेस मटेरीअल्स आणि दुर्मिळ फॅब्रिक संग्रह एकाच छताखाली पाहता येतील. भारतीय कारागिरीचा सर्वोत्तम अनुभव देणारे हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.प्रदर्शनाला प्रवेश आणि पार्किंग दोन्ही मोफत असून, सर्वांसाठी खुले आहे.