पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत

ps logo rgb
  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे धनादेश सुपूर्द

पुणे ; (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) प्रतिनिधी
मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मदतींचा धनादेश करण्यात सुपूर्द करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.
दरम्यान सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार उमेश शेळके, मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला आदी उपस्थित होते.