अखिल महाराष्ट मैराळ दांगट वीर समाजसेवा संघटने 5 ऑक्टोबर 2025 रोजी साडेसतरा नळी दांगट वस्ती समाज मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पद्मश्री उपप्रकार लक्ष्मण माने यांच्या उपोषणादरम्यान तसेच पुणे या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार अखिल महाराष्ट मैराळ दांगट वीर समाजसेवा संघटनेच्या माध्यमातून दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी साडेसतरा नळी दांगट वस्ती समाज मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या एन टी डी एन टी फेडरेशनच्या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते आदरणीय शिवलाल जाधव उपस्थित होते त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धू शिंदे, संघटनेचे अध्यक्ष अनंता भोसले, कार्याध्यक्ष नरेश शिंदे, महिला आघाडी प्रमुख हेमलता चव्हाण, माधवी मोरे, मूळ भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पदाधिकारी गुरुनाथ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार एडवोकेट दिलीप कुऱ्हाडे, कुशल संघटक रवींद्र भाट , सेवानिवृत्त उपायुक्त शिवदास जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी साळुंके, मधुकर मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक काळूराम कदम, रोहिदास साळुंके, बबन कदम, सज्जन जाधव, संघटनेचे खजिनदार सोपान जाधव, सुभाष मोरे, योगेश चव्हाण, प्रितेश पाटील, शिवाजी पवार, तुळशीराम भोसले , दादा पवार, लक्ष्मण सावंत, दिलीप भोसले, साहेबराव सावंत,तसेच युवा कार्यकर्ते दीपक मोरे, राकेश भोसले, समाधान पवार, चंद्रशेखर भोसले, दादा भोसले, कृष्णा भोसले, रोहिदास पाथरकर,, विनोद भोसले, देविदास मोरे, सतीश भोसले, साईनाथ सावंत, अरुण जाधव, पवन भोसले, चेतन मोरे, रुपेश पवार, यूपेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय ज्येष्ठ नेते शिवलाल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण सर्व एकत्र आल्यास हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे आपण मुळात ट्रायबल म्हणजे जमाती आहोत. त्याचप्रमाणे मुंडवा सेटलमेंट मध्ये जी 90 एकर जागा भटक्या विमूक्तांच्या विकासासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी आपण सर्वसमावेशक 42000 बेघर नागरिकांना गुरुकुल योजनेअंतर्गत घरे देऊ शकतो त्यासाठी प्रत्येक समाजातील जाणकार प्रतिनिधी त्यांच्या सोसायटी तयार करणे गरजेचे आहे. या मीटिंग अंतर्गत तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग उत्साही व मोलाचा राहिला अनेक तरुणांनी त्यांच्या भाषणातून या लढ्यामध्ये एकजुटीने सामील होण्याबाबत मते व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वैराळ दांगट वीर समाजाचे अध्यक्ष यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. समाजाच्या उद्धारासाठी सगळ्यांनी एकजुटीने या कार्यास मदत करावी कारण हा प्रश्न येणाऱ्या भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ मार्गदर्शक सज्जन जाधव, काळूराम कदम यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले व आभार दीपक मोरे यांनी मांनले. सर्वांसाठी भोजनाची उत्तम सोय तरुण कार्यकर्त्यांनी केली होती त्या सर्वांचे आभार