पुणे जैन बोर्डिंग हाऊस विषयात धर्मादाय आयुक्तांचा महत्वाचा आदेश

ps logo rgb

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

“अहिंसा परमो धर्म. जैन समाज सर्वच कार्यात पुढे असतो. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले आणि भावना ऐकल्या. जैन समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस हे जैन समाजासोबत राहिले. यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी, पक्षाशी संबंध नाही. आम्ही कोणाच्या विरोधात नाही.

पुण्यातील राजकीय नेते असू द्या, नाहीतर मोहोळ साहेब असू द्या. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. बोर्डिंग वाचली पाहिजे, मंदिर वाचलं पाहिजे आणि जैन समाजाची जागा त्यांचीच राहिली पाहिजे. इतकीच मागणी आहे” असं सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खबिया यांनी सांगितलं.“

भगवान महादेव दिगंबर मंदिर आहे. त्याच्यावर संकट आलेलं आहे. विक्रीमध्ये जरी मंदिराचं नाव नसलं तरी ती जागा मात्र त्यातच येते. आम्ही धर्मादाय आयुक्तालयात आम्हाला तातडीने सुनावणी हवी अशी मागणी केली होती. आज सुनावणी दरम्यान मंदिराचे चित्र, फोटो, पुरावे दाखवले. धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून त्यांच्याकडून आदेश मिळवले हे देखील समजावलं. या महिन्यात 28 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे.

त्यात मंदिर आहे की नाही हा रिपोर्ट द्यायचा आहे” असं ॲड. योगेश पांडे यांनी सांगितलं.“त्यांनी आदेश दिले आहेत की त्या ठिकाणी मंदिर आहे का हे जाऊन पाहा. आयुक्ताची दिशाभूल केली आहे. ट्रस्ट कडे पैसे नाही आणि इमारत मोडकळी झाली आहे असे सांगण्यात आले

. ट्रस्टने जो आदेश पारित केला त्या विरोधात आम्ही युक्तिवाद मांडला आहे. त्यांच्या आधीच्या सुनावणीत कुठेही मंदिराचा उल्लेख नाही. “मंदिरात मुरलीधर मोहोळ येऊन गेले असल्याचे फोटो आहेत.

डॉक्युमेंट्स आहेत.  अर्ज विक्री व्यवहार आधीचा होता. नवीन घटनाक्रम घडला आहे, ते देखील आम्ही मांडणार आहोत. त्या जागेवर मंदिर आहे की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र डोळ्यांनी पाहिलं तर मंदिर दिसतं. सर्वांनी कागदोपत्री मंदिर गायब केलं आहे” असं ॲड. योगेश पांडे म्हणालेजैन समाजासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पुणे जैन बोर्डिंग हाऊस विषयात धर्मादाय आयुक्तांनी एक महत्वाचा आदेश दिला आहे. पुणे शिवाजीनगर येथे ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊस आहे. या हाऊसच्या जागा विक्रीविरोधात एक जनआंदोलन उभं राहिलं होतं.

जैन समाजाच्या भावना, रोष लक्षात घेऊन पुणे जैन बोर्डिंग हाऊस विषयात धर्मादाय आयुक्तांनी स्टेटस्को दिला आहे. म्हणजे परिस्थिती जैसे थे राहणार आहे. आज मुंबईत धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्याकडे एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अती तातडीची सुनावणी पार पडली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी अत्यंत भक्कम व कायदेशीर बाजू मांडली. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन तसेच इतर जैन बांधव उपस्थित होते.

संपूर्ण जैन समाजाचे लक्ष या निर्णायक सुनावणीकडे लागले होते. जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील लढ्याचा आज पहिला टप्पा होता. स्टेटस्को म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे आता ही जागा विकता येणार नाहीय. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या या जागेवर 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी वसतिगृहाची उभारणी केली होती. विश्वस्तांना या जागेवर विकासकामार्फत विकास करायचा होता. पण समाजातील काही लोकांचा याला विरोध होता. काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री केल्याचा आरोप झाला. त्यानंतर एक जनआंदोलन उभं राहिलं. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला मंजुरी देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही आरोप झाले.

Latest News