PCMC: गिलबिले हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई…

पिंपरी | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दोन दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडीतून नितीन गिलबिलेंवर पिस्तुलातून जवळून गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले आणि पायावरून गाडी घालून दोन्ही आरोपी तेथून पसार झाले होते. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून हत्येची क्रूरता स्पष्टपणे दिसून येते.प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अमित पठारे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.नितीन गिलबिले हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी विक्रांत ठाकूरला लोणावळा अँबीवली परिसरातून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अमित पठारे मात्र अद्यापही फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यापैकी विक्रांत ठाकूरला पोलिसांनी अटक केली असून अमित पठारेचा शोध वेगाने सुरू आहे.
