ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
लंडन, युनायटेड किंगडम, (१२ नोव्हेंबर २०२५): जीएमबीएफ ग्लोबल महाबिझ दुबई २०२६ या आगामी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अधिवेशनाची अधिकृत घोषणा लंडन येथील ‘द शेरेटन हिथ्रो’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या यशस्वी रोडशो दरम्यान करण्यात आली. या कार्यक्रमात युनायटेड किंगडम आणि भारतातील प्रमुख उद्योजक, व्यावसायिक आणि समाजसेवी प्रतिनिधी एकत्र आले आणि जागतिक व्यावसायिक सहकार्यासाठी नव्या संधींवर चर्चा केली.
‘जीएमबीएफ’चे बोर्ड सल्लागार डॉ. साहित्य चतुर्वेदी हे दुबईहून लंडनला खास या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी उपस्थितांना ‘महाबिझ दुबई २०२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यवसाय अधिवेशनाविषयी सविस्तर माहिती दिली. हे अधिवेशन ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे होणार आहे. त्यांनी या अधिवेशनाचा उद्देश – विविध उद्योगांना एकत्र आणणे, नवोन्मेष प्रोत्साहन देणे आणि भारत, यूएई तसेच जागतिक व्यावसायिक समुदायामध्ये सीमापार भागीदारी निर्माण करणे — असा असल्याचे सांगितले.
‘जीएमबीएफ ग्लोबल’चे अध्यक्ष डॉ. सुनील मंजरेकर यांनी ऑनलाईन संवादातून एनआरआय व्यावसायिक आणि जागतिक उद्योजकांना ‘महाबिझ दुबई २०२६’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की या अधिवेशनात ३,००० पेक्षा अधिक उद्योग सहभागी होणार असून, आपली उत्पादने, सेवा आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी हा एक विलक्षण जागतिक मंच ठरणार आहे.
‘महाबिझ दुबई २०२६’ च्या निमित्त ‘लंडन’ रोडशो आयोजनामागील उद्देश ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सहयोग, समन्वय, सहकार्य आणि संबंध निर्माण करून व्यावसायिक नातं रुजवणे हा आहे. व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि स्थावर मालमत्ता इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक, भागीदारी आणि ज्ञानविनिमय वाढविण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. युनायटेड किंगडमचे बॅरिस्टर आणि चार्टर्ड अकाऊंटंट मधुप चतुर्वेदी यांनी दुबईच्या आर्थिक स्थितीवर सखोल सादरीकरण केले. त्यांनी दुबईतील सक्षम वित्तीय प्रणाली, उद्योग-पुरस्कृत वातावरण आणि जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून अरब – अमिरातीचे धोरणात्मक महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विविध प्रांतांतील मान्यवर आणि समाजनेते सहभागी झाले होते, त्यामध्ये डॉ. उदेश्वर सिंग (बिहार), श्री संजय (गुजरात), श्री संतोष (महाराष्ट्र), डॉ. अजय सिंग (उत्तर प्रदेश) आणि अनेक अन्य प्रतिनिधींचा समावेश होता. श्री संतोष पारकर यांनी इव्हेंट प्रेमी हे जीडीपीआर मानकांनुसार तयार केलेले ईव्हेंट व्यवस्थापन अॅप सादर केले, जे सहभागींच्या नोंदणी व संवादासाठी उपयुक्त आहे.
तरुण उद्योजक हीत सत्रा यांनी क्वालिटी कंप्लायंट सर्व्हिसेस या आपल्या कंपनीच्या आयटी सेवा सादर करत व्यवसाय क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक संधींचे सविस्तर विवेचन केले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये संजय मोजरिया, डॉ. सुनील मांजरेकर, पंडित पाठक, राहुल दीक्षित, अनिल खेड़कर, राजीव बेनोडकर, छाया बेनोडकर, मोहित घाटे, मानसी लवळेकर, डॉ. मोहिनी आनंदकर, डॉ. उदेश्वर सिंग, संतोष पारकर आणि माला चतुर्वेदी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या समारोपाला आयोजकांनी सांगितले की ‘महाबिझ दुबई २०२६’ हे अधिवेशन जगभरातील व्यावसायिक नेते, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषक यांच्यासाठी जागतिक स्तरावर जोडणी, सहकार्य आणि विस्तारासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mahabiz2026.com किंवा ईमेल info@gmbfglobal.com
छायाचित्र शीर्षक : ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘महाबिझ २०२६’ हे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अधिवेशन येत्या ३१ जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे होणार असून त्याबद्दल डॉ. साहित्य चतुर्वेदी यांनी लंडन येथील ‘द शेरेटन हिथ्रो’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये घोषणा केली. ‘जीएमबीएफ ग्लोबल’चे अध्यक्ष डॉ. सुनील मंजरेकर यांनी ऑनलाईन संवादातून एनआरआय व्यावसायिक आणि जागतिक उद्योजकांना ‘महाबिझ दुबई २०२६’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
