राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख पदी विठ्ठल उर्फ नाना काटे

पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. 14 (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणूकीकरिता प्रचार प्रमुख पदी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची आज (दि. 14) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडीचे पत्र दिले.पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून प्रचार प्रमुख पदी श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विठ्ठल उर्फ नाना काटे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते असून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी मा. अजितदादा पवार साहेब व मा. सुनील तटकरे साहेब यांनी राष्ट्रवादीकडून जबाबदारीचे स्थान देण्यात येत आहे, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.
