राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता राखली….

nitish kumar

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

या निकालांमुळे राज्यात एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी, संयुक्त जनता दलाने मुख्यमंत्रीपदावर नितीश कुमार यांचाच दावा केला आहे.जेडीयूच्या मते, नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि तेच राहणार. जेडीयूने १०१ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८१ जागांवर ते सध्या आघाडीवर आहेत. तर, भाजपने ९० जागांवर आघाडी घेतली आहे. महाआघाडीचा मात्र मोठा पराभव झाला असून, त्यांना ५० जागांच्या आतच समाधान मानावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे बिहारमध्ये एनडीएला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली असून, त्यांनी लढवलेल्या ६१ जागांपैकी केवळ चार जागांवर ते आघाडीवर आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता राखली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने विजय मिळवल्याचे घोषित केले आहे. एनडीए नेत्यांनी याला नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या राजकारणाचा विजय संबोधले आहे. जातीवादी आणि देशविरोधी राजकारणाला बिहारच्या जनतेने कचऱ्याची टोपली दाखवल्याचा दावा भाजपच्या अतुल भातखळकरांकडून  करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीही या विजयात त्यांच्या प्रचाराचा महत्त्वाचा वाटा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, बिहारच्या जनतेने मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र या निकालांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाची भूमिका निरपेक्ष आणि पारदर्शक नसल्याचा आरोप करत, ६५ लाख मतदारांना वगळण्यात आल्यामुळे मतचोरी झाल्याचे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे आहे. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतदारांना पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींसह विरोधकांनी केला आहे. बिहारमधील हे निकाल केवळ “ट्रेलर” असून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खरा “पिक्चर” दिसेल, असे मत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

हारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील २४३ विधानसभांच्या जागांवर १९०-१९९ जागांवर पुढे आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या निकालांची आठवण करुन दिली आहे. या निवडणूकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू यांनी केवळ कमालच केली नव्हती तर विरोधकांना मोठा झटका दिला आहे.

साल २०१० मध्ये बिहारच्या राजकारण लालू यादव सक्रीय होते. तेजस्वी यादव त्याकाळी राजकारणाची कदाचित बाराखडी शिकत होते. सध्या लालू यादव वय आणि विविध आरोप आणि शिक्षेमुळे राजकारणापासून दूर आहेत. त्याचे राजकारण आता त्यांच्या घरापर्यंत मर्यादित झाले आहे. लालू पक्षाचे प्रमुख असले तर सध्या तिकीट वाटपासह राजकीय जबाबदारी तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. एक दोन प्रचारसभा वगळता लालू यादव प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकांचे संपूर्ण नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे होते. परंतू निकाल साल २०१० ची आठवण करुण देणारे आहे.

Latest News