आळंदीतील एमआयटी कॉलेज अनोखा उपक्रम “युवाशक्ती मतदान शक्ती”, “मतदान हा हक्क नाही, तर कर्तव्य आहे”

पिंपरी चिंचवड: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) रॅलीला विविध घोषवाक्यांनी रंगत आणली. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ आळंदी सुंदर आळंदी”, “युवाशक्ती मतदान शक्ती”, “मतदान हा हक्क नाही, तर कर्तव्य आहे” अशा शक्तिशाली घोषवाक्यांनी परिसर दणदणाट केला.ही रॅली कॉलेज कॅम्पसहून सुरू होऊन आळंदी प्रदक्षिणा रस्त्यापर्यंत वळला आणि त्यानंतर परत कॉलेज कॅम्पसवर समाप्त झाला. विद्यार्थ्यांच्या या सशक्त सहभागामुळे आळंदीतील मतदारांमध्ये जागरूकतेचा प्रसार झाला.या महत्त्वाच्या उपक्रमाचे यशस्वी
आयोजन डॉ. सदाशिव कुंभार आणि प्राध्यापक अमित ताले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच, कॉलेजचे सर्व कर्मचारी सदस्य यामध्ये सक्रियपणे सहभागी झाले. या रॅलीचे आयोजन करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या रॅली ला मार्गदर्शन डॉ. बी बी वाफारे यांचे लाभले“युवाशक्ती मतदान शक्ती” यांसारख्या घोषवाक्यांनी स्थानिक समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचा आधार तयार केला आहे. अशा उपक्रमामुळे लोकशाहीत प्रत्येकाचा सहभाग वाढविणे महत्त्वाचे ठरते, आणि त्याचा दीर्घकालीन प्रभाव होईल, अशी आशा आहे..आळंदीतील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज व एमआयटी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ज्युनिअर कॉलेज यांनी आळंदी नगर परिषदेसोबत संयुक्तपणे ‘वोटर्स जागरूकता रॅली’ आयोजित केला. या मोर्चात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचा मोठा परिणाम झाला. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे, स्थानिक नागरिक आणि मतदारांमध्ये मतदानाची महत्त्वता समजावून सांगण्याचा एक उत्कृष्ट मार्ग सापडला आहे. रॅलीतून दिलेले संदेश, विशेषतः “मतदान हा कर्तव्य आहे” आणि
