निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

ps logo rgb

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला.

न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे बारामती नगर परिषदेची निवडणूक पुढे गेली आहे.त्यानुसार आता जिल्हाधिकारी ४ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. तदनंतर नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १९ डिसेंबर हा असेल. तर मतदान २० डिसेंबर रोजी पार पडेल. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल पार पडणार आहे.

बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोजी पर्यंत पुढे ढकलली आहे. नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार देखील अंतिम टप्प्यात आहे. या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते आज ठिकठिकाणी सभा, रॅली आणि बैठका घेणार आहेत.सर्व प्रमुख पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

असे चित्र असतानाच निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. तसेच या नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक रद्द करून पुढे ढकलली असून दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या २ नगरपंचायतीतील निवडणुकाही २० डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी होणार आहे.तर महाबळेश्वर आणि फलटणची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाच्या काही नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने साताऱ्यातील ९ नगरपालिकांपैकी २ नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना आपला नामनिर्देशित पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता चिन्ह वाटप केले.

Latest News