ज्येष्ठ सामाजिक बाबा आढाव 95 व्या वर्षी त्यांनी पुण्यात घेतलाअखेरचा श्वास…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले.त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.
बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी शरद पवार यांनी बाबा आढावांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत.
