जेष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव यांचे निधन

पुणे : (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
भावपूर्ण श्रद्धांजली..!परिवर्तनवादी जनचळवळींना दिशा देणारे, कष्टकरी चळवळींचे ध्येयवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने एक प्रेरणादायी पर्व हरपले.कष्टकऱ्यांचे नेते ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आपल्याला सोडुन गेले…कष्टकऱ्यांचे ‘बाबा’ गेले! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं 96 वर्षी पुण्यात निधन
बाबांसारखा तळमळीने कष्टकऱ्यांच्या साठी काम करणारे समाजसेवक व समाजप्रबोधनातून सर्व समाजघटकांना,हमाल,कागद कचरा गोळा करणाऱ्यांपासून,शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या कल्यानाचा विचार व कृती करणारा समाजसुधारक होणे नाही.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचे आज वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिवदेह पुणे मार्केटयार्ड येथील हमाल भवन येथे उद्या दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायं ५ वा. पर्यंत ठेवण्यात येणार आहे. अत्यंविधी त्याच दिवशी सायं ५ः३० चे सुमारास नवी पेठ येथिल वैकुंठ स्मशानभुमि येथे होईल
.जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी सक्रिय झालो तेव्हा राज्यस्तरावरच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये त्यांचे व्याख्यान ठरलेले असायचे. सिद्धांत, प्रयोग, अनुभव याचे मिश्रण यांचा सार त्यांच्या भाषणात असे. त्यामुळे नेहमीच त्यांच्याबद्दल आदर वाढतच राहिला. 2014 मध्ये जेव्हा धर्मांध शक्ती देशात सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी आपल्या व्याख्यानात याबद्दलचे आकलन मांडले होते भारताला सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. अन्यथा वारंवार फॅसीझमचे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत राहील.आपल्या तरुण वयापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरोगामी विचार सांगणे व तो प्रत्यक्षात जगणे हे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण बाबा आढाव होते.
क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, एन. डी. पाटील, गोविंद पानसरे या सर्वांचे एक वैशिष्ट्य होते की त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रस्त्यावरची लढाई आरोग्याच्या किंवा इतर कोणत्याही कारणास्तव थांबवली नाही किंवा सोडली नाही. नागनाथ अण्णांना ऐकू कमी येत होते हालचाल कमी होती तरी देखील मोर्चाच्या ठिकाणी ते गाडीतून येत बसून राहायचे. डॉ. एन डी पाटील यांनी व्हील चेअर मध्ये बसून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज बिल माफी आंदोलनासाठी बिलांची होळी केली. बाबा देखील महाराष्ट्रातील निवडणुका पक्षपातीपणे लोकशाही विरोधी प्रक्रियेने झाल्या त्यामुळे या वयात देखील सत्याग्रहाला बसले. जैन झी यांची आंदोलने वगैरे आपण बोलत असतो पण या जेन झी च्या समोर काही जिवंत आदर्श असावे लागतात.
महाराष्ट्राला याची उणीव सदैव जाणवत राहील. काही लोक आपल्या आसपास असणे आपल्याला सदैव प्रेरणा देत राहते. सर्वांच्या अलीकडील पुण्यातील आंदोलनामुळे हे प्रकर्षाने जाणवले.आज जेव्हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी या बुजुर्ग नेत्यांनी घडवलेल्या महाराष्ट्राला त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हाच या पिढीतील शेवटचा तारा निखळला आहे. त्यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांच्या पर्यंत नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
