PCMC: आरोग्य विभागाच्या सहकार्याने “नो प्लास्टिक वापर” हा जनजागृतीपर उपक्रम…

ps logo rgb

पिंपरी चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पीसीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या, स्टीलच्या बाटल्या तसेच इतर पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.उपक्रमाच्या अनुषंगाने शाळेच्या परिसरात जनजागृती फलक लावण्यात आले व पर्यावरण रक्षणाविषयी घोषणा देण्यात आल्या.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली. पीसीएमसी आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले. शाळेने भविष्यातही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची बांधिलकी व्यक्त केली.

मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आरोग्य विभागाच्या सहकार्याने “नो प्लास्टिक वापर” हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी प्रेरित केले.

Latest News