निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे स्वागत

rajendra-jagtap-pcmc

निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे स्वागत
प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार दिप्ती कांबळे, राजेंद्र जगताप, उमा पाडुळे व अरुण पवार यांना वाढता पाठिंबा
पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महापालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार दिप्ती अंबरनाथ कांबळे, राजेंद्र गणपत जगताप, उमा शिवाजी पाडुळे व अरुण श्रीपती पवार यांचे लाडक्या बहिणींकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. घराघरांतून लाडक्या बहिणींनी पुढाकार घेत उमेदवारांचे औक्षण करून, फुलांची उधळण केली.या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रभागातील समस्या आणि स्थानिक विकासाबाबत चर्चा केली. प्रचाराला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे मनोबल वाढले आहे. एकूणच निवडणूक प्रचारात महिलांचा वाढता सहभाग लक्षवेधक ठरत आहे.घराघरांतून संवाद साधताना महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या
विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत पुढील काळातही मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एकूणच प्रचारात सकारात्मक वातावरण असून, नागरिकांचा वाढता सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या आत्मविश्वासात भर घालत आहे.

‘लाडकी बहिण’ उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहोत. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे.
– उमेदवार राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Latest News