अहो, चव्हाण साहेब, मुद्द्याचं बोला की…”अजित पवारांच्या आरोपांना उत्तर न देता प्रश्नांपासून पळ काढण्याचा केविलवाणा प्रयत्न – योगेश बहल,अध्यक्ष पिं. चिं. शहर

Backup_of_ps logo rgb

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक भाजपच्या सत्तेवर पुराव्यांसह गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले असताना, त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विषयांतर करत मूळ प्रश्नांपासून पळ काढल्याचा आरोप करत चव्हाण मुद्दाच बोला असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिले आहे.
शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्थानिक भाजपने भ्रष्टाचाराने पोखरले असून महापालिकेवर कर्जाचा डोंगर उभा केला, असा थेट आरोप केला होता.
महापालिकेत दिवसाढवळ्या भ्रष्टाचार करणारी लुटारूंची टोळी कार्यरत असून, रस्ते खोदाई, कचरा व्यवस्थापन, पदपथ आणि अगदी कुत्र्यांच्या नसबंदीसारख्या कामांतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच टेंडर प्रक्रियेत संगनमत (‘रिंग’) करून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शहरातील कामे आपापसात वाटून घेतली आहेत, असा गंभीर दावा देखील त्यांनी मांडला होता. या सगळ्या ठोस आणि तांत्रिक आरोपांवर उत्तर देताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी एकाही मुद्द्यावर पुराव्यासह खंडन केले नाही, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे योगेश बहल यांनी सांगितले.
बहल म्हणाले की, “कुत्र्यांच्या नसबंदीपासून ते रस्ते खोदाई आणि टेंडरमधील ‘रिंग’पर्यंतच्या भ्रष्टाचारावर चव्हाणांनी चकार शब्द काढला नाही. हे मौन म्हणजेच आरोपांना मिळालेली अप्रत्यक्ष कबुली आहे.” याऐवजी चव्हाण यांनी “आपल्या गिरेबानात डोकावून पाहा”, “७० हजार कोटींचे जुने आरोप” अशा विषयांतराचा आधार घेत अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक“विकास आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ‘पैलवानकी’ची भाषा वापरणे लोकशाहीला शोभणारे नाही. ही भाषा म्हणजे उत्तर नसल्याची आणि पराभवाच्या भीतीतून आलेली हतबलता आहे,” असे बहल यांनी ठणकावून सांगितले. मोदी–फडणवीस यांच्या चांगल्या कामाचे कौतुक अजितदादांनी नेहमीच केले आहे. लोकशाहीत आरोपांना उत्तर हे कामातून आणि तथ्यांतून द्यायचे असते, केवळ राजकीय चिखलफेक, धमकी किंवा जुने पाढे वाचून नाही. रवींद्र चव्हाण यांनी आता तरी इकडे-तिकडे न भरकटता अजित पवारांनी उपस्थित केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रत्येक मुद्द्यावर ‘मुद्द्याचं’ बोलावे, अन्यथा पिंपरी-चिंचवडची जनता योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही योगेश बहल यांनी दिला.

अजितदादांनी केलेल्या आरोपांचा संक्षिप्त गोशवारा माहितीसाठी खाली देत आहोत.
१) गेल्या ९ वर्षांत २०१७-१८ रासून ५९,२१५ कोटींचे बजेट, ३०-३२ टक्के पगारपाणी. उरलेले
४०,००० कोटी काय खर्च केला ती काम दाखवा…
२) महापालिका कर्जबाजारी केली ते कसे आकडेवारीसह सांगितले…
३) २०१५-१६ मध्ये ठेवी ४,८४४ कोटी होत्या त्या मुदलावर व्याज पकडून आजवर त्या किमान
१०,००० कोटी झाल्या पाहिजे होत्या. प्रत्यक्षात २,१३२ कोटी आहेत म्हणेज८००० कोटी
मोडल्या…
४) डुडुळगाव – पंतप्रधान आवास ११९० सदनिका १४२.८९ कोटींची निविदा – १६७.८२ कोटी.
२५ कोटी जादा खर्च…
५) सेक्टर १२ मध्ये ६,४५२ सदनिका ६३० कोटींचे काम (PMRDA) १७-१८ टक्के कमी दराने ११५ कोटी
कमी दर. जमिनीसह बिल्डर ३८०० रुपये दर, तर यांचा दर ४००० रुपये
६) स्मार्ट सिटी केबल नेटवर्क २५० कोटींचा फसले. ६०० पैकी २०० कोटी बंद. व्हाईटनर लावून
बिले…
७) डिपी – कुदळवाडी १७५ एकराचे आरक्षण…
८) ई-लर्निंग १२३ शाळा ४२ कोटी पाण्यात गेले…
९) स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे लाख रुपयांचे लाच प्रकरण
१०) कुत्र्यांची नसबंदीतही लूटमार.
सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धीस द्यावी ही विनंती.

योगेश मंगलसेन बहल
शहराध्यक्ष, मा.महापौर

Latest News