ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात एकत्र….

Backup_of_Backup_of_ps logo rgb


“चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात एकत्र.

मुंबई, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) (मनोरंजन प्रतिनिधी) : अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या महोत्सवातील प्रतिष्ठित मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारासाठी हा चित्रपट स्पर्धेत असून, हा त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

ह्या चित्रपटाचे चित्रीकरण जपान आणि भारतात झाले असून हा एक अभूतपूर्व मराठी रोमँटिक चित्रपट आहे.
जपान केवळ पार्श्वभूमी किंवा वेगळे स्थळ म्हणून नाही, तर पात्रांच्या आतल्या भावनिक अंतराचे प्रतिबिंब असलेल्या भावनिक अवकाशासारखा उलगडतो. हा चित्रपट अंतर, काळ आणि बदलत्या भावनिक वास्तवामुळे नातेसंबंध कसे बदलतात याचा शोध घेतो.
सुरुवातीला अतिशय उत्कट असलेले एक नाते काळानुसार, प्राधान्यक्रमांमुळे, परस्परविरोधी स्वभावांमुळे व अनाठायी अपेक्षांमुळे कसे विषारी बनते हे या कथानकातून उलगडते. विभक्त झाल्यानंतर सात वर्षांनी ते पुन्हा एकदा जपानमध्ये भेटतात तेव्हा जुन्या जखमा, अर्धवट राहिलेल्या गोष्टी, भावना, इच्छा पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि काळाने बदललेली माणसं त्यांच्यातील विरलेले प्रेम पुन्हा शोधू शकतात का?

इरावती कर्णिक यांनी ह्याच्या आधी “झिम्मा”, “आनंदी गोपाळ” यांसारखे महत्त्वाचे चित्रपट लिहिलेले आहेत व मोहित टाकळकर यांनी “मीडियम स्पायसी”, “द ब्राईट डे”,”चिरेबंदी”, “ऑकेजनल रिफ्लेक्शन ऑन द कॉन्टिन्जेन्सीज ऑफ लाईफ” असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

या चित्रपटातून ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर येत आहेत. २०१७ मधील बहुचर्चित “चि व चि सौ का” नंतर ही जोडी पुन्हा दिसणार असून, त्यांच्या सादरीकरणात सहजता आणि भावनिक खोली जाणवते.

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील “बयान”, बर्लिनाले २०२३ मधील “घात” आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता “पिकासो” यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शिलादित्य बोरा यांनी प्लटून वन फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट निराळ्या, दिग्दर्शक-केंद्रित सिनेमाला प्रोत्साहन देण्याच्या बांधिलकीला पुढे नेतो.
“आपल्या दोघांच्या आठवणी वेगवेगळ्या असतील तर?” ह्या एका वाक्याने मी फार प्रभावित झालो असं चित्रपटाच्या PIFF निवडीबद्दल बोलताना निर्माते शिलादित्य बोरा म्हणाले. हाच प्रश्न या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. दोन व्यक्ती एकाच नात्यात, एकाच क्षणात असतात, पण त्या अनुभवांना वेगवेगळ्या पद्धतीने जतन करतात. काळ जसा पुढे सरकतो, तसं प्रेम बदलतं, कधी कधी तुटतंही. ते खोटं होतं म्हणून नाही, तर आठवणी, प्राधान्यक्रम आणि आपापली विश्व वेगळी होऊ लागतात. मराठी सिनेमाच्या कक्षा कशा रुंदावतील, त्याच्या सीमा आपल्याला कशा ओलांडता येतील ह्याचा विचार या चित्रपटामध्ये नक्की आहे. “घात” च्या तीव्र वास्तववादापासून ते “पिकासो” च्या शांत, अंतर्मुख करणाऱ्या जगापर्यंत अशा निराळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न प्लटून वन फिल्म्स ने नेहमीच केला आहे. “तो, ती आणि फुजी” ही त्याच मालिकेतील नवी कथा, नव्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न आहे. PIFF सारख्या महत्त्वाच्या महोत्सवात हा चित्रपट सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी स्पर्धा विभागात “तो, ती आणि फुजी” ची निवड होणं अत्यंत समाधानकारक आहे. दरवर्षी पुणे शहर अत्यंत गंभीरपणे आणि कुतूहलाने ह्या महोत्सवाची वाट पाहातं. हा एक प्रकारे सांस्कृतिक क्षण आहे. PIFF मधे भाषेच्या सीमांना ओलांडून वेगवेगळ्या देशांचे चित्रपट प्रदर्शित तर होतातच परंतु ह्या कामांचा एकमेकांमध्ये संवाद घडतो, याचा मला विशेष आनंद आहे. हा चित्रपट ठामपणे शहरी आहे, समकालीन पुण्यात रुजलेला आहे. यातील पात्रं सोप्या उत्तरांनी प्रश्न सोडवताना दिसत नाहीत. आपापली भावनिक अस्वस्थता ठामपणे मांडतात आणि त्यावर अडूनही राहतात. चित्रपटाची कथा सरळसोट नाही. पात्रांच्या फाटलेल्या मनाची गुंतागुंत दाखवणारी आहे. गोष्टी सोप्या उत्तरांनी मिटवण्याऐवजी भावनिक अस्वस्थतेत असण्याची हिंमत ठेवतो. चित्रपटाच्या पहिल्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी PIFF पेक्षा योग्य व्यासप…

Latest News