भोसरी गावठाण मधील भाजपा उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या – नगरसेवक रवी लांडगे

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपा उमेदवारांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, पुणे (दि. १० जानेवारी २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मागील सार्वत्रिक निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिले. भाजपचे तत्कालीन शहर अध्यक्ष आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि नंतरचे शहर अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मध्ये आणि विशेष करून भोसरी गावठाण परिसरात भव्य दिव्य प्रकल्प उभारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा भव्य पुतळा तसेच सर्व्हे नंबर १ मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी प्रशिक्षण केंद्र, प्रगतीपथावर असणारे भव्य स्टेडियम, सार्वजनिक मंडई, नागरिकांना अहोरात्र वैद्यकीय सेवा सुविधा देणारे अत्याधुनिक १०० बेडचे नूतन भोसरी रुग्णालय, बैलगाडा शर्यत शिल्प, योगासन समूह शिल्प, संपूर्ण भोसरी गावठाण मध्ये अंतर्गत सिमेंटचे रस्ते, पुनर्विकास केलेला जलतरण तलाव, महानगरपालिकेचे भव्य विद्यालय ही कामे म्हणजे “आयकॉन” आहेत. मला ज्या प्रमाणे दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून दिले त्याप्रमाणेच भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ७ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन भाजपाचे दुसऱ्यांना बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी केले.
भोसरी गावठाण, प्रभाग क्रमांक ७ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांनी शुक्रवारी दिघी रोड, सँडविक कॉलनी, भोसरी गावठाण, शितल बाग, आपटे कॉलनी येथील परिसरात पदयात्रा काढली व घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला त्यांना प्रचार पत्रक देऊन भाजपाच्या कमळ चिन्ह पुढील बटन दाबून संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले, यावेळी भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांनी मतदारांशी संवाद साधला तसेच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या पदयात्रेत अशोक लांडे, संदीप गवारे, हिरामण लांडगे, बाबू खराबी, तन्मय गव्हाणे, पै. तुळशीराम लोंढे, अंकुश लोंढे, विजय फुगे, अनिल लोंढे, संतोष फुगे, सागर लोंढे, राजू टाकळकर, किरण लांडगे, श्रीकांत लांडगे, चंद्रकांत विठ्ठल लांडगे, दत्तात्रेय पांडुरंग फुगे, विजय बबन लांडगे, काळुराम पवळे, सागर डोळस, किसन लांडगे, जीवन फुगे, राजू लोंढे, सूरदास फुगे, संदीप झंझाड, बाळू गायकवाड, निवृत्ती बजाबा लांडगे, निलेश लांडगे, ॲड. अमर लांडगे, किरण शिवाजी लांडगे, बाजीराव परशुराम लांडगे, कालिदास परशुराम लांडगे, बाजीराव शंकर लांडगे, बंडोपंत जगन्नाथ लांडगे, मनोज जगताप, संजय लक्ष्मण पठारे, अनिल ज्ञानेश्वर लोंढे, वैभव पोळ, चंद्रकांत नथू लोंढे, पंकज गव्हाणे, राजु राक्षे, दादू डोळस, संदीप राक्षे, हभप सुदाम माने, दत्ताभाऊ गव्हाणे, माऊली भोपते, दिलीप तांबे, राहुल लांडगे, रोहिदास खोंडे, , योगेश चंद्रकांत लांडगे, राहुल चंद्रकांत लांडगे आदींनी सहभाग घेतला होता.
