प्रभाग २६ मधील राजकारणाची गणिते बदलली; विलास नांदगुडे यांच्या अपक्ष पॅनलला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा*

*प्रभाग २६ मधील राजकारणाची गणिते बदलली; विलास नांदगुडे यांच्या अपक्ष पॅनलला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा*
*वंचित बहुजन आघाडीची साथ मिळताच अपक्ष पॅनल मजबूत; प्रभाग २६ मध्ये निवडणूक रंगात*
पिंपळे निलख | प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. पिंपळे निलख येथील मा. स्थायी नेते विलास नांदगुडे यांच्या अपक्ष पॅनलला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे

. या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून निवडणूक लढतीत नवे समीकरण तयार झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव तसेच राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी याबाबतचे अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
या पत्रामुळे अपक्ष पॅनलला मोठे बळ मिळाले असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी सायली पायगुडे, श्रुती सोरटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पॅनलमध्ये अपक्ष उमेदवार शंतनु नांदगुडे, मीरा कदम आणि सगर पवार यांचा समावेश आहे.
समाजकारण, स्थानिक विकास आणि सर्वसामावेशक नेतृत्व या मुद्द्यांवर काम करणाऱ्या या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.प्रभाग क्रमांक २६ मध्ये मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला सशक्तीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत.
विलास नांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष पॅनलने या प्रश्नांवर ठोस विकासात्मक अजेंडा मांडला असून नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे दलित, वंचित, कामगार, महिला व तरुण वर्गामध्ये सकारात्मक संदेश गेला. असून आगामी निवडणुकीत प्रभाग २६ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे
