पिंपरी गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे वातावरण – संदीप वाघेरे यांचे प्रतिपादन

ps

पिंपरी दि. 12 (प्रतिनिधी) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपळे गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे वातावरण आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आणि महापौर राष्ट्रवादीचाच होणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे व्यक्त केला.आपल्यासह डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकीता कदम या राष्ट्रवादीच्या चार जणांच्या पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली. तसेच घरोघरी संपर्क साधण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला

यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नगरसेवक या नात्याने काम करताना विविध विकास कामांना गती दिल्याचे सांगितले. संजय गांधी ⁠नगरमध्ये पावसाच्या दिवसात झोपड्या पाण्यात असतात. त्यांना नेहमी मदत करण्याचे काम केले. गोरगरीब रुग्णांसाठी जिजामाता हॉस्पिटलचे नूतनीकरण करून ते अद्ययावत करून घेतले. महर्षी वाल्मिकी, तसेच गणेश मंदिर बांधकामासाठी मदत केली . कोविडच्या काळात 24 तास लोकांसाठी काम केले. ⁠प्रभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व झोपडपट्टी अंतर्गत येणारे भूमिगत विद्युत केबल, काँक्रिट रस्ते या कामांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

या प्रचार फेरीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे कल्पना घाडगे ज्योती साठे अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, संपूर्ण शहरात राष्ट्रवादीमय वातावरण आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आणि महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे. असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला.
माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.