निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सज्ज 12000 पोलिसांचा फौजफाटा…

vote

पुणे :  (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिस अंमलदार, वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक आणि उपायुक्त अशा पद्धतीने बुथ केंद्रावरील चारस्तरीय सुरक्षितता तैनात केला आहे. वादविवादासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी पथक दक्ष आहेत. मतदान प्रकियेवेळी कायदा सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेवरही आहे. त्याअनुषंगाने जबाबदारी वाटून घेण्यासाठी ४५४ झोन केले आहेत. त्याठिकाणी हद्दीतील ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शानाखाली पेट्रोलिंग केले जाणार आहे. त्याचा आढावा वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला जाणार आहे.दरम्यान, शहरात ३ हजार ९८३ बुथ केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक कर्मचारी व होमगार्ड तैनात असणार आहे. सोबतच स्थानिक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त असणार आहे. ९१३ इमारतीत संपूर्ण मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याठिकाणी दोन अंमलदार नियुक्त केले जाणार आहे. प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जाणार आहे.राज्यातील बहुचर्चित महानगरपालिकांसाठी, बहुप्रतिक्षेत गुरुवारी (दि.15) मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीचा दहा दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी आज बंद होत असून, मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. वरिष्ठ अधिकारी ते पोलीस अंमलदार असा तब्बल 12 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त आखण्यात आला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. संवेदनशील मतदार केंद्रासह महत्वाच्या केंद्रावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

शहरात 90 संवेदनशील मतदान केंद्रे – शहरात ९० संवेदनशील मतदान ठिकाणे असून, त्यादृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. त्याठिकाणी १ अधिकारी आणि ५ कर्मचारी नियुक्त केले जाणा आहेत. तर ८ क्यूआरटी टीम दक्ष ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ६ अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत प्रत्येकी ५० पोलीस अमलदारांचे स्ट्रायकिंग असणार आहे.

मतदानासाठी पुणे पोलिसांचा बंदोबस्त – पोलीस आयुक्त व पोलिस सहआयुक्त यांच्या देखरेखीखाली चार अपर पोलिस आयुक्त, १४ पोलिस उपायुक्त तसेच ७ हजार ,पोलिस अमलदार व अधिकारी आणि ३ हज होमगार्ड यासोबतच एसआरपीफफ चार कंपन्या असणार आहेत. चारचाकीद्वारे ५०० कर्मचारी पेट्रोलिंग करणार असून, आठ क्यूआरटी टीम तैनात आहेत.