भव्य बाईक रॅलीने प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादीच्या पॅनेलची प्रचाराची सांगता

ps

पिंपरी दि. 13 ( प्रतिनिधी) -(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ
काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने प्रचाराची सांगता करण्यात आली. या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.

शगुन चौक, साई चौक, बुढा मंडळ, संजय लायब्ररी,शालीमार गल्ली
वैष्णवीदेवी मंदिर, मुद्रा गणपती
अय्यपा मंदिर, पीडब्ल्यूडी
गल्ली, बाँबे सॅन्डविच (साई सागर), हेमू कलानी गार्डन, अशोक थिएटर,तपोवन मंदिर, गणेश हॉटेल, डिलक्स चौक, हाँगकाँग गुरुदवार (डिलक्स चौक), मिलिंद नगर रिव्हर
रोड, झुलेलाल घाट, संजय गांधी नगर, वैभव नगर, पवनेश्वर मंदिर, कापसे आळी,
बोट क्लब रोड, गीता निवास, वाघेरे कॉ-4, वाघेरे कॉ-1
, वाळुंजकर आळी, भीमनगर
म्हाडा, समृद्धी हॉटेल, बाळामळ चाळ, भैरवनाथ चौक
शिंदे आळी, पवना आळी,
गव्हाणे आळी, संदीप वाघेरे ऑफिस असा सर्व परिसर बाईक रॅलीच्या माध्यमातून पिंजून काढण्यात आला

या प्रचार फेरीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे कल्पना घाडगे ज्योती साठे अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .

यावेळी बोलताना माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, बाहेरच्या लोकांनी नेतृत्व करण्याचा प्रश्न काही मंडळी उपस्थित करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकाची तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्याध्यापकाची भूमिका वठवत अनेकांना घडवले आहे. मात्र नको ते वाद पुन्हा पुन्हा रंगवले जात आहेत. त्या मंडळींना पिंपरी चिंचवडचे सिंगापूर दुबई व्हावी असे वाटत नाही हीच खरी खंत आहे. परवा घडलेल्या प्रकारामुळे प्रियंका कुदळे दहशतीखाली आहेत. मतदानातून दहशतवादी प्रवृत्तींना घरी बसवा असे आवाहन वाघेरे यांनी केले.
प्रियंका कुदळे यांनी आजूबाजूला काही घटना घडत आहेत.मात्र सामना करून पुढे जाणार असा विश्वास नागरिकांना दिला.

माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.

Latest News