यशराज अमराळे व गौरव वाघेरे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड

पिंपरी, पुणे (दि. १४ मार्च २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) –
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व संदिपभाऊ वाघेरे युवा मंच संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली महाराष्ट्र केसरी निवड कुस्ती चाचणी स्पर्धेत पै. गौरव वाघेरे (माती) आणि पै. यशराज अमराळे, (गादी) विभागातून यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ६८ वे आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत वाघोली, पुणे येथे दिनांक १८ ते २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यासाठी पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धेतून गादी विभागातून (८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट) चर्होलीचा पै. यशराज अमराळे आणि आकुर्डीचा पै. तन्मय काळभोर यांच्यात लढत झाली. यामध्ये अमराळे गुणांनी विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढती साठी प्रवेश निश्चित केला. तर माती विभागातून पिंपरीचा पै. गौरव वाघेरे आणि भोसरीचा पै.समाधान दगडे यांच्यात चुरशीशी लढत झाली. पै वाघेरे याने अधिक गुण मिळवत विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत मध्ये प्रवेश मिळवला.
तसेच या स्पर्धेत बालगट व कुमार गट यांच्या देखील निमत्रिंत कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.
(वरिष्ठ गट)
गादी विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :
५७ किलो वजन गट –
प्रथम – वेदांत जाधव ( भोसरी)
द्वितीय – सुमित कदम (रहाटणी)
६१ किलो वजन गट
प्रथम – तुषार पवार(आकुर्डी)
द्वितीय – महेश सलगर (पिंपरी)
६५ किलो वजन गट
प्रथम – महेश जाधव( भोसरी)
द्वितीय – अवधुत तांबेकर( रहाटणी)
७० किलो वजन गट
प्रथम – योगेश्वर तापकिर (चर्होली)
द्वितीय – कृष्णा काटे (पिंपळे सौदागर)
७४ किलो वजन गट
प्रथम – जयेश शेलार (भोसरी)
द्वितीय – सिद्धार्थ आगिवले (पिंपरी)
७९ किलो वजन गट
प्रथम – अजिंक्य सांडभोर (चिखली)
द्वितीय – राज बालवडकर (पिंपळे निलख)
८६ किलो वजन गट
प्रथम – पृथ्वीराज लांडगे (भोसरी)
द्वितीय – सौरव शिंगाडे (किवळे)
९२ किलो वजन गट
प्रथम – पृथ्वीराज नढे (रहाटणी)
द्वितीय – कौस्तुभ जगताप (पिंपळे गुरव)
९७ किलो वजन गट
प्रथम – सौरभ जाधव (दिघी)
द्वितीय – पवन चव्हाण (भोसरी)
८६ ते १२५ महाराष्ट्र केसरी गटः
प्रथम – यशराज अमराळे (चर्होली)
द्वितीय – तन्मय काळभोर (आकुर्डी)
(वरिष्ठ गट)
माती विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :
५७ किलो वजन गट
प्रथम – ओम तापकीर(चऱ्होली)
द्वितीय – अजिंक्य माचुत्रे (चिंचवड)
६१ किलो वजन गट
प्रथम – प्रतिक धिमधिमे (चर्होली)
द्वितीय – विनायक नाईक(रहाटणी);
६५ किलो वजन गट
प्रथम – संकेत माने (आकुर्डी)
द्वितीय – करण खंडाळे (भोसरी)
७० किलो वजन गट
प्रथम – प्रणव सस्ते (मोशी)
द्वितीय – स्वराज जाचक (पिंपळे सौदागर)
७४ किलो वजन गट
प्रथम – ओमकार हिंगणे (मोशी)
द्वितीय – परशुराम कॅम्प (आकुर्डी)
७९ किलो वजन गट
प्रथम – चंद्रभान मदने ( मोशी)
द्वितीय – गणेश साठे (पिंपरी)
८६ किलो वजन गट
प्रथम – दिग्विजय काळे (भोसरी)
द्वितीय – अथर्व तांबे (रहाटणी)
९२ किलो वजन गट
प्रथम – तेजस फेंगसे (ताथवडे)
द्वितीय – शेखर लोखंडे (पिंपळे गुरव)
९७ किलो वजन गट
प्रथम – साहिल नखाते (रहाटणी)
द्वितीय – विश्वजीत कोंडे (पिंपळे निलख)
८६ ते १२५ किलोगट महाराष्ट्र केसरी गट
प्रथम – गौरव वाघेरे (पिंपरी)
द्वितीय – समाधान दगडे (भोसरी)
(बालगट) निमंत्रित
निकाल पुढील प्रमाणे
२८ किलोगट
प्रथम – सिध्देश रंधवे (थेरगांव)
द्वितीय – रुद्रनिल पिंजण (ताथवडे)
३२ किलोगट
प्रथम – वरद जमदाडे (भोसरी)
द्वितीय – वेदांत जाधव (आकुर्डी)
३५ किलोगट
प्रथम – आज्ञेश गवळी (भोसरी)
द्वितीय – पंकज हिप्परकर (रहाटणी)
४० किलोगट
प्रथम – विराज माने (थेरगांव)
द्वितीय – स्वराज भुजबळ (भोसरी)
४५ किलोगट
प्रथम – स्वराज लांडगे (भोसरी)
द्वितीय – हर्षवर्धन मोरे (चिखली)
(कुमारगट) निमंत्रित
४५ किलोगट
प्रथम – ओम नखाते (रहाटणी)
द्वितीय – अनिकेत गाडे (आकुर्डी)
५० किलोगट
प्रथम – जय गोडांबे (रहाटणी)
द्वितीय – श्रवण शिंदे (भोसरी)
५५ किलोगट
प्रथम – प्रणव लांडगे (भोसरी)
द्वितीय – रतन वाघमारे (रहाटणी)
६० किलोगट
प्रथम – रणजित हिप्परकर (रहाटणी)
द्वितीय – आयाज शेख (आकुर्डी)
६५ किलोगट
प्रथम – चेतन हिप्परकर (रहाटणी)
द्वितीय – शौर्य खेडकर (रहाटणी)
या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, नगरसेवक संदिपभाऊ वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुट…
