हिंदू तरुणींनी फसवणूकीपासूनसावध व्हावे —-महेश पवळे संस्थापक राजे शिवराय प्रतिष्ठान

Backup_of_Backup_of_Backup_of_ps logo rgb


पुणे (प्रतिनिधी) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
“प्रेमाचे नाटक करून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत लव्ह जिहाद मध्ये अडकविले जात असल्याने त्यापासून सावध होण्याचे आवाहन “राजे शिवराय प्रतिष्ठान”चे संस्थापक महेश पवळे यांनी केले.कर्वेनगर येथील नटराज व गिरिजा शंकर वस्ती मधील नागरिकांसाठी स्वस्तिश्री सोसायटी द्वारा आयोजित सोसायटीच्या मैदानावर विराट हिंदू संमेलन आयोजित केले होते त्यावेळी महेश पवळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की,”हा एक सापळा असतो त्यात युवतींनी अडकता कामा नये त्यासाठी युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे.सकल हिंदू समाज सशक्त व सामर्थ्यवान बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.हिंदू परंपरा,संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण,संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे राहून कार्य करावे.”असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सुप्रसिद्ध लेखिका व इतिहासकार सायली गोडबोले-जोशी यांनी पंच परिवर्तन संदर्भात मनोगत व्यक्त केले.यावेळी पुणे स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब व योगासनाचे बहारदार प्रात्यक्षिके यावेळी करून दाखविली.कुटुंब प्रबोधन या विषयाला अनुसरुन सादर करण्यात आलेल्या सोलापूर येथील अपर्णा सहस्त्रबुद्धे संचलित भारुड आणि विद्यार्थांनी सदर केलेल्या पथनाट्याला उपस्थितांनी दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुवर्णा बोडस यांनी केले.सोसायटीचे अध्यक्ष ॲड धनंजय खुर्जेकर यांनी प्रमुख पाहुण्याचा सत्कार केला.किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.पुष्कराज सप्रे ह्यांनी गायिलेल्या वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
ह्या विराट हिंदू संमेलनास कर्वेनगर मधील गिरिजा शंकर,नटराज सोसायटी मधील नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Latest News