शहर अभियंता पदाची नियुक्ती नसतानाही मनोज सेठीया यांचा कारभार सुरु

754347

पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठीया यांची शहर अभियंता या पदावर नियुक्ती अथवा निवड झाली नसतानाही ते शहर अभियंता हे पदनाम वापरत असून प्रशासकीय कामकाज करीत असल्याने महापालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी महापालिकेचे अधिकारी मनोज शेठिया यांचा कारभार म्हणजे ” उतावळा नवरदेव गुडघ्याला बाशिंग “पिंपरी:- ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता श्री मनोज सेठीया यांना ” शहर अभियंता ” पदाची एवढी घाई झाली आहे की ते महापालिका प्रशासनाने शहर अभियंता पदावर निवड करण्याच्या अगोदरच ” शहर अभियंता ” म्हणून कारभार हाकू लागले असून त्यांचा कारभार पाहून ” उतावळा नवरदेव गुडघ्याला बाशिंग ” या मराठी म्हणीचा प्रत्यय येत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सध्या जोरात सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता हे पद गेली अनेक महिन्यापासून रिक्त आहे. त्याचा परिणाम महापालिका कामकाजावर होत आहे. शहर अभियंता पदासाठी श्री. मनोज सेठीया,श्री प्रमोद ओंबासे आणि श्री संजय कुलकर्णी हे तीन अधिकारी प्रयत्नशील आहेत.

पदोन्नतीची क्रमवारी पाहता श्री मनोज सेठीया यांची या पदावर निवड होऊ शकते.मात्र शहर अभियंता हे शहराच्या दृष्टीने खूप महत्वाचे पद असून या पदाची जबाबदारी श्री मनोज सेठीया यांना पेलणार का ? याबाबत प्रशासन शासंक असल्याने प्रशासन निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात येते. शहर अभियंता पदावर श्री मनोज सेठीया यांची नियुक्ती व्हावी यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे कारभारी विशेष प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीची आज ( शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी ) बैठक आयोजित केली असून आजच्या बैठकीत श्री मनोज सेठीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे

. शहर अभियंता या पदावर आजच्या तारखेपर्यंत श्री मनोज सेठीया यांची निवड झालेली नाही अथवा प्रशासनाने प्रभारी शहर अभियंता म्हणून ही आदेश काढलेला नाही, केवळ बांधकाम विभागाचे कामकाज दिले आहे. मात्र शहर अभियंता या पदावर बसण्याची घाई झालेले श्री मनोज सेठीया स्वतःच शहर अभियंता हे पद नाम वापरून आदेश काढू लागल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.