​रिक्षा चालकांच्या संयमाचा अंत; तातडीने मॅन्युअल फिटनेस सुरू न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठणार! – शुभम तांदळे (युवक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत) यांचा ईशारा….

ps logo rgb

​पुणे/पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
“राज्यातील आरटीओ रिक्षा सह कार्यालयांमध्ये व्यावसायिक वाहनांची योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे लाखो रिक्षा चालक देशोधडीला लागले आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन झोपलेले आहे. जर ही समस्या तात्काळ सुटली नाही, तर ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी दिला आहे.

​नेमके प्रकरण काय?
​दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांत ‘ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन’ (ATS) च्या नावाखाली मॅन्युअल फिटनेस तपासणी बंद करण्यात आली आहे. मात्र, ही नवीन यंत्रणा अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. परिणामी, हजारो रिक्षांचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण रखडले असून, रिक्षा रस्त्यावर काढणे कायदेशीररीत्या गुन्हा ठरत आहे.

​शुभम तांदळे यांनी मांडलेले आक्रमक मुद्दे:
​शासनाचा सावळा गोंधळ, चालकांना भुर्दंड: फिटनेस प्रक्रिया बंद असतानाही, रिक्षा चालकांकडून दररोज ५० रुपये विलंब शुल्क (दंड) वसूल केला जात आहे. ही शासनाची उघड लूट असून चालक हा दंड का भरतील? असा सवाल तांदळे यांनी उपस्थित केला आहे.
​उपासमारीची वेळ: रिक्षा बंद असल्याने चालकांना घराचे भाडे, मुलांची फी आणि रिक्षाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. कष्टकऱ्यांच्या चुली विझवण्याचे पाप हे प्रशासन करत आहे.

​सुरक्षेला धोका: विना फिटनेस वाहन चालवताना अपघात झाल्यास विमा मिळत नाही. अशा वेळी होणाऱ्या जीवितहानीला सर्वस्व जबाबदार परिवहन विभाग असेल.

​आंदोलनाचा एल्गार:
​या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे, या पूर्वी संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे, परंतु हा प्रश्न मार्गी लागत नाही,

त्यामुळे आता केवळ चर्चेने प्रश्न सुटणार नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशी भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतने घेतली आहे.
​”आम्ही आतापर्यंत सनदशीर मार्गाने विनंती केली, पण प्रशासनाला कष्टकऱ्यांच्या रक्ताचे पाणी दिसत नसेल, तर डॉ. बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड, पुणे आरटीओसह संपूर्ण महाराष्ट्रभर चाक्का जाम आंदोलन करण्यात येईल. रिक्षा चालकांच्या अस्तित्वाची ही लढाई आता आरपारची असेल!”
— शुभम तांदळे (युवक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत)

​प्रसिद्धीसाठी

शुभम तांदळे
(युवक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत) संपर्क: ९०६७२२५१३१

Latest News