कामगारांच्या मृत्यूचे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी मृतांच्या जाती-धर्म शोधणारे खरे जातीवादी आणि संविधान विरोधी – डॉ. बाबा कांबळे यांची सणसणीत टीका

baba-kamble

“कामगारांच्या मृत्यूचे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी; डॉ बाबा कांबळे,
‘मृतांच्या जाती-धर्म शोधणारे खरे जातीवादी आणि संविधान विरोधी’ – डॉ. बाबा कांबळे यांची सणसणीत टीका.”

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर कष्टकरी कामगार पंचायतीचा आक्रमक पवित्रा; जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध”**

पिंपरी-चिंचवड, १५ जुलै २०२६: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपोमधील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी घडलेली दुर्घटना ही केवळ तांत्रिक चूक नसून प्रशासकीय निष्काळजीपणा आणि कंत्राटदारांच्या अमानवीय वृत्तीचा परिपाक आहे. नऊ निष्पाप कंत्राटी कामगारांचा बळी गेल्यानंतर, कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले परंतु, या बाबीची आम्ही कधी फोटो स्टेशन केले नाही, या ठिकाणी जाऊन फोटो काढणे आमच्या उद्देश नसून कामगारांना न्याय मिळवून देणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे असे आम्ही समजतो, मात्र, या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून काही समाजकंटक धार्मिक व जातीय वळण देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते संविधान विरोधी व जातीवादी आहेत असे म्हणत, डॉ. बाबा कांबळे, धार्मिक दुर्विकरण व कामगारांची जात शोधणाऱ्यांचा, तीव्र निषेध केला आहे.

धार्मिक-जातीय ध्रुवीकरणाचा निषेध: मृत्यूस जात नसते!
डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले की, “कामगार हा केवळ कामगार असतो. ज्यांना कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांची जात आणि धर्म शोधण्याची गरज वाटते, तेच खरे जातीवादी आणि संविधान विरोधी आहेत. मृत्यूचे राजकारण करणे हे मानवतेला काळिमा फासणारे आहे. काही राजकीय हेतूने प्रेरित लोक आमदार महेशदादा लांडगे यांच्यासारख्या विकासकामात मग्न असलेल्या लोकप्रतिनिधींना बदनाम करण्यासाठी या घटनेचा वापर करत आहेत, जे अत्यंत निंदनीय आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची तत्पर व संवेदनशील भूमिका:
कामगारांच्या पाठीशी खंबीर सरकार या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, कामगारांच्या हितासाठी सरकार तत्पर असल्याचे सिद्ध केले आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी समितीचे गठन, महानगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन, कंपनीच्या प्रकल्प प्रमुखांना झालेली तातडीची अटक आणि दोषींवर कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश, हे ‘कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही’ या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे निदर्शक आहे.

भारतीय जनता पक्ष हे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असून, शहराध्यक्ष शत्रुघन बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिक पातळीवर पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि प्रशासनावर योग्य दबाव निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीने उभे आहे.

आमदार महेश दादा लांडगे: विकासाचे आणि कामगारांच्या न्यायाचे प्रतीक
आमदार महेश दादा लांडगे यांनी दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा प्रश्न त्यांनी विधानसभेपासून ते स्थानिक स्तरापर्यंत नेहमीच लावून धरला आहे. त्यांच्या विधायक आणि विकासवादी कार्याला रोखण्यासाठी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने चोख उत्तर दिले पाहिजे. कामगारांचे जीवन सुरक्षित ठेवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे आणि आमदार महेश दादा लांडगे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय आणि आर्थिक मदत:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने घोषणा करत प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ₹५ लाख इतकी मदत जाहीर केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ₹१० लाख आणि दोषी ‘अँथनी लारा’ कंपनीने ₹२५ लाख अशी एकूण ₹४० लाख इतकी आर्थिक मदत प्रत्येक वारसांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, प्रत्येक पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी किंवा महानगरपालिका सेवेत नियुक्ती देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. ही मदत केवळ आर्थिक नसून, कुटुंबांच्या भवितव्याची हमी देणारी आहे. ही निर्णय कामगार हिताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी म्हटले आहे.

कष्टकरी कामगार पंचायतीच्या प्रमुख मागण्या:
१. कठोर फौजदारी कारवाई: ‘अँथनी लारा’ कंपनीच्या सर्व जबाबदार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कंपनीला कायमस्वरूपी ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात यावे…

Latest News