पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्याची दखल घेत पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार हॉटमिक्स, कोल्डमिक्स, मुरूम, जीएसबी तसेच पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून दुरुस्ती करण्यात आली. या कालावधीत मुरूम, जीएसबी आदी साहित्य वापरून २ हजार ८१२ चौ.मी. क्षेत्रावर सर्फेसिंगचे काम करण्यात आले. पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून १४९ चौ.मी. क्षेत्रावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉटमिक्स पॅचवर्कमध्ये औंध-बाणेर भागात सर्वाधिक करण्यात आले. या भागात ३ हजार ३६१ चौ.मी. क्षेत्रावर डांबरीकरण करण्यात आले. वानवडीमध्ये ३ हजार ८२ चौ.मी., धनकवडी-सहकारनगर-कात्रजमध्ये २ हजार ३० चौ.मी., कॅन्टोन्मेंटमध्ये १ हजार ६३४ चौ.मी., हडपसर-मांजरीमध्ये १ हजार २८५ चौ.मी. आणि कोथरूड-बावधनमध्ये १ हजार २०२ चौ.मी. क्षेत्रावर हॉटमिक्स पॅचवर्क करण्यात आले.
chalkan औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. खेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित ‘चाकण डी-क्लॉग वर्क’ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांचा थेट ताळेबंद मांडण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी प्रत्यक्ष ६ तास सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना कडक शब्दांत सुनावत, मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास थेट ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्याचा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेच्या पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वयाने राबवलेल्या मोहिमेत ७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत २७ हजार २१० चौरस मीटर क्षेत्रावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. यामध्ये हॉटमिक्स प्लांटच्या माध्यमातून २० हजार ५६७ चौरस मीटर क्षेत्रावर डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्यात आले आहे. तर कोल्डमिक्स बॅगच्या माध्यमातून ३ हजार ६८२ चौरस मीटर क्षेत्रावर डांबरीकरण करण्यात आले.
मात्र, शहरातील रस्त्यांची मोठी लांबी आणि खड्ड्यांचे वाढते प्रमाण पाहता करण्यात आलेली ही दुरुस्ती पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात केलेले पॅचवर्क पुन्हा उखडू नये यासाठी कामांचा दर्जा आणि वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासण्याची आवश्यकता आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार
