मनोज सेठीया शहर अभियंता झाल्यानंतर, बांधकाम विभागात उपअभियंता बदली प्रकरणी, करोडोंचा व्यवहार ? पैसे घेऊन कामाचे वाटप केल्याची चर्चा

pcmc-2

पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )

.पिंपरी ( प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग हा आर्थिक दृष्ट्या गजबजलेला विभाग म्हणून प्रसिद्ध असून या विभागात मागील महिन्यात उपअभियंता यांना कामाचे ठिकाण नव्याने वाटप करण्यात आले आहेत. हे करत असताना या विभागाचे प्रमुखांनी उप अभियंता याच्याकडून लाखो रुपये घेवून करोडोंचा व्यवहार केला असून पैसे न देऊ शकलेल्या उपअभियंता मध्ये विभाग प्रमुख च्या विरोधात नाराजी पसरली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

चेहरे पाहून कामाचे वाटप…उद्यान स्थापत्य विभागात सह शहर अभियंता म्हणून कार्यरत असणारे मनोज सेठीया यांची महापालिका शहर अभियंता बांधकाम परवानगी विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.मनोज सेठीया हे बांधकाम विभागात रुजू झाल्यानंतर लगेचच त्यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा घाट घातला. ज्या गांवात जास्त धंदा असेल त्या गावाची बोली लावून त्यांना जो अभियंता जास्त पैसे देईल त्याला त्या गावाचे कामकाज दिले आहे

बांधकाम विभागातील कामाचे वाटप करताना चेहरे पाहून व मोठ्या रकमा घेऊन कामाचे वाटप केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.या बदल्यांमध्ये एका महिन्यात तब्बल करोडो रुपयांचा व्यवहार झाला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

बांधकाम विभागाचा अनुभव कमी…महापालिका बांधकाम विभागात ०१ सहशहर अभियंता, ३ कार्यकारी अभियंते आणि १७ उपअभियंते कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी व कर्मचारी संपूर्ण शहरातील २० गुंठ्यावरील बांधकामाना परवानगी देण्याचे काम करतात. फेब्रुवारी २०२६ रोजी मकरंद निकम यांनी सेवानिवृत्ती घेतली. आणि त्यांच्या ठिकाणी बांधकाम विभागाचा खूप कमी अनुभव असणारे मनोज सेठीया यांची वर्णी लागली. मात्र एकाच महिन्यात बांधकाम विभागात कामाचे वाटप करताना जवळचा,लांबचा, ओळखीचा,जास्त पैसे देणारा असा भेदभाव केल्याने शहर अभियंता मनोज सेठीया यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून शहराच्या दृष्टीने अती महत्वाच्या बांधकाम विभागाचे कामकाज कसे चालणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

Latest News