पुण्यात नेत्यांचाच घरात घुसखोरी उघडकीस…

daroda ghuskhori

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास एका तरुणाने प्रवेश केल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. २६ सप्टेंबर शनिवारी रोजी सकाळी ६.१५ वाजता ही घटना घडली. या घुसखोराने रात्री ३ वा नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या गच्चीवर प्रवेश केला होता व सकाळी ७ वा बंगल्याच्या सुरक्षारक्षक व ड्युटीवरील पोलिसाने त्याला पकडले.तरुणाने आपण विद्यार्थी असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे असल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. \

मग तो पहाटे डॉ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानी का आला? त्याच्याकडील साहित्याचा उपयोग कशासाठी होणार होता? त्याची खरी ओळख काय? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
संबंधित तरुणाच्या बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे दहा मीटर लांबीची दोरी आढळल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे.तसेच त्याआधी घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन ही बंद केले होते. शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील बंगल्यात पहाटेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाने केलेल्या घुसखोरीने खळबळ उडाली आहे. हातात हातोडा, पक्कड, हातमोजे आणि तब्बल १० मीटर लांबीची दोरी घेऊन या तरुणाने बंगल्यात प्रवेश केला होता. इतकेच नव्हे, तर पकडले जाण्यापूर्वी त्याने बंगल्यातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे घरी नव्हत्या.

Latest News