पुण्यातील महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप…

suside

पुणे- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी जरांडेचा विवाह ओंकार घिसरे याच्याशी झाला होता. वैष्णवी बंगळूरू येथील एका आयटी कंपनीत कार्यरत होती. लग्नानंतर काही काळ ती वर्क फ्रॉम होम करत होती. याच काळात कार खरेदी करण्यासाठी सासरच्यांकडून ५ लाख रुपयांची मागणी केली जात होती आणि त्यासाठी तिचा छळ होत होता, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबाने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.लग्नानंतर वैष्णवी आणि ओंकार हे एकत्र राहात होते. तिने तिच्या सासरी राहून काम करणं सुरू ठेवलं होतं कंपनीची संमती घेऊन तिने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. मात्र कार घ्यायची आहे तुझ्या घरून ५ लाख रूपये घेऊन ये म्हणून वैष्णवीचा तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि नवऱ्याने छळ केला असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पुण्यातील उंड्री भागात एका २३ वर्षीय विवाहित महिला आयटी इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

सासरच्या मंडळींनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.आयटी इंजिनिअर असलेल्या वैष्णवी जरांडे या २३ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातल्या उंड्री भागातील आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे, तर तिच्या आई-वडिलांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप करत या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी तिच्या पतीने म्हणजेच ओंकारने तिच्या माहेरी फोन केला होता. वैष्णवीला घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन केला आणि सासरी आपल्याला खूप त्रास होत असल्याचे सांगितले, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या पतीचा तिच्या माहेरी फोन आला. “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरंवाईट होईल”

वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली? वैष्णवीने आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे अन्य कारण आहे? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोप हे वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच तिच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

असं तो म्हणाला होता सांगण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या फोननंतर वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन लागला नाही. मुलीच्या सुरक्षिततेची चिंता वाटल्याने ते तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र तिच्या घरी गेल्यानंतर वैष्णवीचा मृत्यू झाला आहे असं तिने आत्महत्या केली असं तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई वडिलांना सांगितलं.

Latest News