पुण्यात संतापलेल्या एका आमदाराने महापालिका आयुक्तांनाच दिली धमकी….

पुणे ::(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
अनेक महिने झाले, तरी निविदा प्रक्रिया पुढे जात नसल्याने महापालिका आयुक्तांनी जे योग्य आहे त्या पद्धतीने निविदेचे काम पुढे न्या आणि ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. कागदपत्रांच्या छाननीनंतर आमदारांकडून ज्या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात होता, तोच ठेकेदार गुणवत्तेवर पात्र ठरला.
तसेच आमदारांच्या ठेकेदारापेक्षा या पात्र ठेकेदाराने ९ कोटींनी खर्च कमी दाखविल्याने महापालिकेच्या निधीची बचत झाली. महापालिकेत खेटे मारूनही मर्जीातला ठेकेदार पात्र न ठरल्यामुळे त्या आमदाराने आयुक्तांना फोन करून, गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही दमबाजी केली. पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता प्रकल्पात
मर्जीतील ठेकेदार डावलला गेल्याने संतापलेल्या एका आमदाराने महापालिका आयुक्तांनाच थेट धमकी दिली. या आमदाराने आयुक्तांना ‘तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो,’ अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही ‘विधानसभेत तुमच्याविरुद्ध हक्कभंग आणतो’ अशी दमबाजी केल्याने प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकाराबाबत विचारले असता आयुक्त नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला पण त्या आमदाराचे नाव सांगण्यास नकार दिला
निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून त्याऐवजी मर्जीातल्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आमदाराने प्रशासनावर दबाव आणला होता. या राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडली होती.
आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि २ किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढली होती. यात ८ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता.
